Latest Crime News saam tv
देश विदेश

Crime News: 14 राज्य, 569 बनावट कंपनी आणि 1,047 कोटींची फसवणूक; जीएसटी विभागाने केली मोठी कारवाई

14 राज्य, 569 बनावट कंपनी आणि 1,047 कोटींची फसवणूक; जीएसटी विभागाने केली मोठी कारवाई

Satish Kengar

Latest Crime News: बनावट कंपन्या चालवणाऱ्या टोळ्यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेमध्ये, जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या जयपूर विभागाच्या अधिकार्‍यांनी दिल्ली स्थित एक मोठी गुन्हेगारी टोळी उघडकीस आणली आहे.

ही टोळी 569 बनावट कंपन्या चालवत होती आणि त्यांच्यामार्फत त्यांनी प्रचंड फसवणूक करत 1,047 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट तयार केला होता. मुख्य सूत्रधार ऋषभ जैन, वय 30, दिल्लीचा रहिवासी असून त्याने या बनावट कंपन्या चालवण्यासाठी 10 कर्मचारी नियुक्त केले होते.

व्यापक पाळत आणि माहितीचे विश्लेषण केल्यानंतर, जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या जयपूर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्लीत या प्रमुख सूत्रधाराचा शोध घेण्यात आणि त्याला पकडण्यात यश आले.  (Latest Marathi News)

या 569 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या टोळीने 6,022 कोटी रुपयांची करपात्र उलाढाल असलेल्या पावत्या जारी केल्या ज्यात 2,000 हून अधिक लाभार्थी कंपन्यांना 1,047 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट समाविष्ट आहे. यापैकी बहुतांश बनावट कंपन्या दिल्लीत असून महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, झारखंड, गुजरात, हरियाणा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा, आसाम आणि उत्तराखंड या 13 इतर राज्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या आहेत. आतापर्यंत या टोळीद्वारे आणि दलालांद्वारे वापरण्यात आलेल्या 73 बँक खात्यांवर टाच आणण्यात आली आहे.

ऋषभ जैनला 25.06.2023 रोजी अटक करण्यात आली आहे आणि आर्थिक गुन्हे न्यायालय, जयपूर येथे हजर करण्यात आले असता 7.07.2023 पर्यंत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

Mumbai Firing : मुंबई हादरली! 32 वर्षीय तरुणीवर गोळीबार, परिसरात खळबळ

Tharवाल्याचा विकृतपणा! आधी कट मारला, नंतर रिव्हर्स घेत वृद्धाच्या अंगावर घातली भरधाव कार|Video Viral

SCROLL FOR NEXT