Karnataka Crime Saam Tv
देश विदेश

Crime: कॉलेजच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बॉयफ्रेंडने व्हिला बुक केला; जबरदस्ती गुंगीचे औषध पाजलं, नंतर...

Karnataka Crime: कर्नाटकमध्ये १९ वर्षीय तरुणीवर बॉयफ्रेंडने मित्राच्या मदतीने सामूहिक बलात्कार केला. इन्स्टाग्रामवरून दोघांची मैत्री झाली होती. या घटनेमुळे कर्नाटकात खळबळ उडाली आहे.

Priya More

Summary -

  • व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी खासगी व्हिलामध्ये कॉलेज विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

  • बॉयफ्रेंडनेच मित्राच्या मदतीने तरुणीसोबत केलं भयंकर कृत्य

  • गुंगीचे औषध पाजून तरुणीला बेशुद्ध करून अत्याचार केला

  • पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला

१९ वर्षीय कॉलेजच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये ही घटना घडली. पीडित तरुणीच्या बॉयफ्रेंडनेच आपल्या मित्राच्या मदतीने तिच्यासोबत हे भयंकर कृत्य केले. पीडित मुलीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर आरोपींनी आळीपाळीने बलात्कर केला. ही घटना व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी घडली होती. आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने हा प्रकार कुणाला सांगितला नव्हता पण आता तिने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली.

पीडित मुलीच्या बॉयफ्रेंडने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जक्कूर येथे एक प्रायव्हेट व्हिला बुक केला होता. या व्हिलामध्ये तरुणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत गेली होती. त्याठिकाणी तरुणीच्या बॉयफ्रेंडचे मित्र देखील होते. आरोपींनी पीडितेला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलगी बन्नेरघट्टा येथील एका खासगी महाविद्याल्यात शिक्षण घेत आहे. पश्चिम बंगालचा रहिवासी असलेल्या डिक्सिन नावाच्या तरुणावर तिचे प्रेम होते. त्यानेच तिच्यासोबत हे भयंकर कृत्य केले.

पीडितेने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, या वर्षी जानेवारीमध्ये तिची आरोपीसोबत इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. दोघेही चॅटिंग करायचे. त्यानंतर आरोपी डिक्सिनने प्रेम व्यक्त केले. पीडित मुलीने देखील त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांचे भेटण्याचे ठरले. पीडित मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत गेली होती. सुरूवातीला आरोपीसोबत ती जेवली. त्यानंतर त्याने तिला जक्कुरमधील एका खासगी व्हिलामध्ये भेटण्यासाठी नेले. त्याठिकाणी गेल्यानंतर आरोपीने तिला गुंगीचे औषध दिले. पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर डिक्सिन आणि त्याचा मित्र निखिलने तिच्यावर बलात्कार केला.

प्रेमाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. आरोपीचा मित्र निखिलने दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेला घरी जाऊन दिले. या घटनेबद्दल कुणाला काही सांगितले तर तुला मारून टाकू अशी धमकी आरोपींनी दिली होती. घाबरलेली मुलगी इतक्या दिवस शांत बसली होती. पण नंतर पीडितेने घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT