Smriti Mandhana and Palash Muchhal Unfollow on Instagram Saam Tv
देश विदेश

Breaking News : नातं कायमच तुटलं! स्मृतीने पलाशला सोशल मीडियावरूनही केलं अनफॉलो

Smriti Mandhana and Palash Muchhal Unfollow on Instagram : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच लग्न रद्द झालं असून दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Alisha Khedekar

  • स्मृती आणि पलाशचे लग्न पुढे ढकलले गेले होते

  • मात्र आता स्मृती आणि पलाशचे लग्न रद्द झाले आहे

  • सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले

  • चाहत्यांमध्ये चर्चा वाढल्या

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न मोडलं असल्याची बातमी समोर आली आहे. शिवाय या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. स्मृतीने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली असून काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल हे गेल्या ६ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. यावर्षी या दोघांनी लग्नासाठी पुढाकार घेतला. ठरल्याप्रमाणे त्यांचं लग्न २३ नोव्हेंबरला होणार होत मात्र स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्याने हे लग्न स्थगित झालं. त्यानंतर नव्या चर्चांना उधाण आले.

सोशल मीडियावर पालाशच्या बाहेरील संबंधांबद्दल अनेक अफवा समोर आल्या. मात्र पलाशची बहीण आणि स्मृतीचे व्यवस्थापक तहन मिश्रा यांनी श्रीनिवास मानधना यांची प्रकृती बरी झाल्यानंतरच लग्न केले जाईल, असे सांगितले होते. पण पलाश आणि स्मृतीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार त्यांचं लग्न मोडलं असल्याचे म्हटलं आहे.

त्यांनतर स्मृतीने आपल्या इंस्टाग्रामच्या फॉलो लिस्टमधून सुद्धा पलाशला अनफॉलो केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता बऱ्याच चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे: जनगणना कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मोठी बातमी! एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत दाखल, अमित शाहांची तातडीने भेटणार, राज्यात नेमकं काय सुरू?

डेटिंग अ‍ॅपवर मैत्रीच्या जाळ्यात अडकला, गुंतवणुकीच्या आमिषाने 7 कोटी रुपये गमावून बसला

Diabetes Symptoms On Face: डायबिटीज झाल्यास चेहऱ्यावर दिसतात ही लक्षणे, वेळीच ओळखा नाहीतर...

Sindhudurg Tourism : सागरी किनारा अन् ओला सुगंध वारा! सिंधुदुर्गमध्ये लपलाय आरस्पानी सौंदर्याने मोहून टाकणारा 'हा' बीच

SCROLL FOR NEXT