'गाय दूध देत नाही'! म्हणून शेतकऱ्याने केली पोलीस ठाण्यात तक्रार Saam Tv
देश विदेश

'गाय दूध देत नाही'! म्हणून शेतकऱ्याने केली पोलीस ठाण्यात तक्रार

शेतकरी आपल्या गायीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : वाद, मारहाण, चोरी अशा तक्रारी पोलीस ठाण्यात नोंदवले जात असलेले तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल, पण एक शेतकरी मात्र, आपल्या गायीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. आपली गाय दूध देत नाही (Cow) आता तुम्हीच तिला समजावा अशी विनवणी शेतकऱ्याने चक्क पोलिसांना यावेळी केली आहे. शेतकऱ्याची अशी तक्रार ऐकून पोलीस अधिकारीही खूपच हैराण झाले आहेत.

सामान्यपणे पाळीव प्राण्यांसंबंधी कोणती समस्या असेल, तर प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेले जाते. पण हा शेतकरी आपल्या गायीला चक्क पोलिसांकडे घेऊन आला आहे. कर्नाटकच्या (Karnataka) शिमोगो जिल्ह्यामधील ही घटना आहे. (police). सिदलीपुरा गावातील हा शेतकरी रमैयाने होलेहोन्नूर पोलीस ठाण्यात ही अजब प्रकारची तक्रार दिली आहे. चारा खायला घातल्यानंतर देखील आपली गाय दूध देत नाही आहे, असे त्यानी यावेळी पोलिसांना सांगितले आहे. (cow not giving milk farmer complaint at police station)

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्याने सांगितले आहे की, तो रोज सकाळी ८ आणि रात्री ११ वाजता आपल्या गायीला चारा खायला घेऊन जातो. संध्याकाळी ४ आणि ६ वाजता देखील तो तिला चारा देतो. पण तरी मागील ४ दिवसांत तिने दूध दिले नाही. गायीला दूध देण्याकरिता आता तुम्हीच तिला तयार करा. शेतकऱ्याची ही समस्या ऐकून पोलीस देखील हैराण झाले आहेत. त्यांनी त्या शेतकऱ्याला समजावले.

आपण या समस्येचे निवारण करू शकत नाही, अशी तक्रार नोंदवली जात नाही, असे सांगून त्यांनी त्या शेतकऱ्याला घरी परत पाठवले आहे. याअगोदर मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) भिंड जिल्ह्यात देखील असाच एक विचित्र प्रकार समोर आला होता. येथील एक शेतकरी आपली म्हैस घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला होता. म्हशीवर कोणीतरी काळी जादू केल्याने तिने दूध देणे बंद केल्याचा संशय त्यांनी यावेळी व्यक्त केला होता.

पोलीस अधिक्षक अरविंद शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार की, बाबुलाल जाटव (वय-४५) यांनी शनिवारी नयागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याची म्हैस मागील काही दिवसांपासून दूध देत नसल्याने शेतकरी चिंतित आहे. शेतकऱ्याने सांगितले की, काही गावकऱ्यांनी शेतकऱ्याला सांगितले होते की, म्हशीवर कोणीतरी जादूटोना केला आहे.

यानंतर शेतकरी म्हशीला घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचला होता. आणि पोलिसांकडे मदतीचे आवाहन करण्यात आले होते. यावर पोलिसांनी पशूच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सूचना दिला. त्यानंतर गावकरी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि पोलिसांचे आभार मानले. कारण यानंतर म्हशीने दूध दिल्यामुळे शेतकऱ्याची चिंता मिटली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT