कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिश्रित डोसाचे उत्तम परिणाम? ICMR चा दावा
कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिश्रित डोसाचे उत्तम परिणाम? ICMR चा दावा  Saam Tv
देश विदेश

कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिश्रित डोसाचे उत्तम परिणाम? ICMR चा दावा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षांपासून जगभर कोरोना Corona विषाणूने चांगलेच थैमान घातले आहे. कोरोना विषाणूमध्ये सतत होणारा बदल जगभरामधील शास्त्रज्ञांसाठी scientists चिंतेचा विषय ठरला आहे. कोरोना विषाणूचे नवीन व्हेरिअंट Variant शरीरामध्ये तयार झालेल्या प्रतिकारशक्तीला सहजपणे चकमा देऊ शकतात. असे अनेक संशोधनामध्ये research म्हटले आहे.

यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याकरिता काय करता येईल. या अनुषंगाने शास्त्रज्ञ वेगवेगळ्या उपायांचा पाठपुरावा करत आहेत. या दिशेने संशोधन केल्यावर अनेक देशांनी आपल्या नागरिकांना मिक्स- अँड- मॅच लस Mix and match vaccines ​देण्यास सुरुवात केली आहे. २ वेगवेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या लसीचे २ डोस घेतल्यावर शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती आणखी मजबूत होत असल्याचा दावा विदेशात झालेल्या संशोधनामध्ये करण्यात आलेला आहे.

हे देखील पहा-

भारत देशानेही या दिशेने एक पाऊल उचले असून, मिक्स- अँड- मॅच लसीकरणाच्या परिणाम जाणून घेण्याकरिता एक संशोधन करण्यात आले आहे. याबाबत माहिती इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने ICMR दिली आहे. आयसीएमआरने जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये सांगण्यात आले आहे की, भारतात तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड आणि कोव्हॅसीनचा मिश्रित डोस घेतल्यावर शरीरामध्ये सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

कोविशिल्ड आणि कोव्हॅसीन या २ लसीचे वेगवेगळे डोस घेतल्यावर रोगप्रतिकारक शक्ती आणखी मजबूत होऊ जाऊ शकते, असा दावा संबंधित निवेदनामध्ये करण्यात आला आहे. ICMR ने सांगितले आहे की, संशोधकांनी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या २ स्वदेशी लसी एकत्रित करत त्यावर अभ्यास केलेला आहे. अशा पद्धतीची मिक्स- अँड- मॅच लस केवळ सुरक्षितच नाही, तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी प्रभावी ठरू शकणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. असे असले तरी सध्या भारताच्या लसीकरण प्रोटोकॉलनुसार, ज्या कंपनीच्या लसीचा १ डोस घेण्यात आला आहे, त्याच कंपनीचा २ डोस घ्यावा, अशा सूचना देण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT