Corbavax Vaccine Saam Tv
देश विदेश

कोविशील्ड, कोवॅक्सीन घेतलेल्यांना Corbavax चा बूस्टर डोस घेता येणार

बायोलॉजिक ई कंपनीच्या कॉर्बेवॅक्स बूस्टर डोसला सरकारने मान्यता दिली आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : बायोलॉजिक ई कंपनीच्या कॉर्बेवॅक्स बूस्टर डोसला सरकारने मान्यता दिली आहे. हा बूस्टर डोस १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांना दिला जाईल. ज्यांनी कोविशील्ड (Covishield) किंवा कोवॅक्सिनचे पहिले दोन डोस घेतले आहेत. त्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बायोलॉजिकल ई द्वारे विकसित केलेली कॉर्बेवॅक्स लस १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी बुस्टर डोस मंजूर करण्यात आला आहे. ही परवानगी लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) च्या कोविड-19 वर्किंग ग्रुपने गेल्या आठवड्यात केलेल्या शिफारशीवर आधारित आहे.

कॉर्बेवॅक्स ही देशातील पहिली लस आहे जी पहिल्या आणि दुसऱ्या डोसशिवाय बुस्टर डोस म्हणून दिली जाते. ज्या व्यक्तीने कोवॅक्सीन किंवा कोविशील्डची लस घेतली आहे, त्यांना कॉर्बेवॅक्सचा बूस्टर डोस मिळू शकतो.

भारतातील पहिली स्वदेशी RBD प्रोटीन सब्यूनिट लस, Corbevax, सध्या १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून वापरली जात आहे. भारताचे ड्रग कंट्रोलर जनरल (GCGI) ने ४ जून रोजी तिसरा डोस म्हणून १८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना कॉर्बेवॅक्स देण्यास परवानगी दिली.

कोविड समितीची २० जुलै रोजी बैठक झाली. या बैठकीत तिसऱ्या टप्प्यातील डेटाचा आढावा घेतला. यामध्ये १८ ते ८० वर्षे वयोगटातील कोविड-19 निगेटिव्ह व्यक्ती ज्यांनी Covishield किंवा Covaxin चे पहिले दोन डोस घेतले होते, त्यांना Corbevax लसीचा तिसरा डोस दिल्यानंतर त्यांच्या प्रतिकारशक्तीवर होणारा परिणाम. याचा डेटा तपासला यात Covavax चा पहिला आणि दुसरा डोस किंवा Covishield घेतला आहे, त्यांना तिसरा डोस म्हणून Corbevax दिला जाऊ शकतो. यामुळे अँटीबॉडीजची वाढ होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

SCROLL FOR NEXT