Covid 19: लस घेण्यास नकार दिल्याने वायूदलातून कर्मचाऱ्याची हकालपट्टी Saam Tv
देश विदेश

Covid 19: लस घेण्यास नकार दिल्याने वायूदलातून कर्मचाऱ्याची हकालपट्टी

कोरोना प्रतिबंधक लस टोचून घ्यायला नकार दिल्याने एका कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : कोरोना Corona प्रतिबंधक लस Vaccine टोचून घ्यायला नकार दिल्याने एका कर्मचाऱ्याची हकालपट्टी केल्याची माहिती भारतीय Indian वायूदलाकडून गुजरात Gujarat उच्च न्यायालयाला court देण्यात आलेली आहे. वायूदलामधील सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, तरीही देशामधील वायूदलाच्या ९ कर्मचाऱ्यांनी ही लस टोचून घेण्यास नकार दिलेला आहे.

त्यामधील एकाला सेवेमधून बरखास्त करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारकडून Central Government ​न्यायालयात देण्यात आली आहे. वायूसेनेचे कॉर्पोरल योगेंद्र कुमार यांच्या याचिकेवर बुधवारी भारताच्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल देवांग व्यास यांनी न्यालयात आपली बाजू मांडली होती. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार कोरोना प्रतिबंधक लस टोचून न घेतलेल्या ९ कर्मचाऱ्यांना त्यांचे कारणे दाखवून नोटिस पाठवण्यात आली आहेत.

हे देखील पहा-

त्यापैकी ८ जणांची त्याला उत्तरे आली आहेत. मात्र, एका कर्मचाऱ्याने त्या नोटिसीला उत्तर दिले नसल्यामुळे त्याच्यावर बरखास्तीची कारवाई कऱण्याचा निर्णय वायूदलाने आता हाती घेतला आहे. वास्तविक, कोरोना प्रतिबंधक लस टोचून घ्यायची की नाही. हा प्रत्येकाला निवडीचा भाग आहे. सर्वसामान्य नागरिकांना ही लस टोचून न घेण्याचा निर्णय़ घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे. मात्र, वायूदला मध्ये काम करण्याकरिता हा अत्यावश्यक निकष आहे. यामुळे सेवेच्या ज्या साधारण नियम आणि अटी असतात.

त्यामध्ये आता कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतलेली असने, या गोष्टींचाही समावेश करण्यात येणार आहे. या अटींची पूर्तता न केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे. बरखास्तीची कारवाई झाल्यावर या कर्मचाऱ्याने नोटिसाला उत्तर दिल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली आहे. त्यानुसार या उत्तराचा विचार करावा आणि कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून न टाकता त्याला आणखी एक संधी देण्याबाबत विचार करण्यात यावे, असा सल्ला गुजरात हायकोर्टाने यावेळी दिलेला आहे. आता वायूदलाकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो, ते बघणे आता महत्त्वाचे असणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

SCROLL FOR NEXT