RTPCR Test Saam TV
देश विदेश

Corona Alert : केंद्र सरकारचं कठोर पाऊल, या ६ देशांंतून आलेल्या प्रवाशांना विना RTPCR प्रवेशबंदी

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी या निर्णयाची माहिती दिली.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : कोरोनामुळे चीनमध्ये हाहाकार माजला आहे. चीन पाठोपाठ अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रसार हळूहळू वाढत आहे. भारताच्या दृष्टीने पुढचे 40 दिवस खूप महत्त्वाचे असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणून केंद्र सरकारने खबरदारी म्हणून अनेक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहेत.

कोरोना महामारीची नवी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने १ जानेवारीपासून चीनसह या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी (RTPCR Test) अनिवार्य केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी या निर्णयाची माहिती दिली.

मनसुख मांडविया यांनी म्हटलं की, १ जानेवारीपासून चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांनी कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह देणे आवश्यक असेल.

मांडविया पुढे म्हणाले की, या ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांना फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह COVID रिपोर्ट एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल. प्रवासाच्या ७२ तासांच्या आत कोविड चाचणी करावी लागेल.

सध्या भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विमानतळावर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे, परंतु प्रवाशांनी विमानात चढण्यापूर्वी RT-PCR अहवाल सादर करणे आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे काही देशांमध्ये कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर भारत सरकारने अलर्ट जारी केला आहे आणि कोविड गाईडलाईन्स वे कडक करण्यात आले आहेत. यासोबतच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

SCROLL FOR NEXT