couple wedding  saam tv news
देश विदेश

ज्यानं वडिलांची हत्या केली, त्याच्याच मुलीशी तरुणानं केलं लग्न; आईनंही रोखलं नाही, कारण...

साम टिव्ही ब्युरो

एका तरुणाने वडिलांची हत्या (fathers death) करणाऱ्या दोषी आरोपीच्या मुलीशी (Marriage) लगीनगाठ बांधली. मात्र, मुलाच्या विधवा आईने पतीच्या खुन्याच्या मुलीला आपली सून करून घेण्यास विरोध केला नाही. उलट तिने हे लग्न आनंदाने लावून दिले. पूर्व आफ्रिकेतील रवांडा (Rawanda) या देशातील ही घटना आहे.  १९९४ मध्ये रवांडामध्ये नरसंहार झाला होता. १०० दिवसात साधारण ८ लाख लोकांची हत्या (people death) करण्यात आली होती. यावेळी बर्नाडेट मुकाकबेराच्या पतीचीही हत्या करण्यात आली होती. एका मुलाखतीत बर्नाडेटने बीबीसीला सांगितलं की, तेव्हा जे झालं त्याच्याशी आमच्या मुलांचा काही संबंध नाही. हे दोघे प्रेमात पडले (Love Affairs) आणि एकमेकांवर अतीव प्रेम करण्यापासून कुणी कुणाला रोखू शकत नाही.

६ एप्रिल १९९४ रोजी रवांडाच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर या हत्याकांडाला सुरुवात झाली. ते हुतू समाजातील होते.  घटनेच्या काही तासांनंतरच याचा राग तुत्सी समाजातील लोकांमध्ये पसरला. हुतू समुदायातील लोक आपल्या आजूबाजूच्या तुत्सी समाजातील लोकांची हत्या करू लागले. बर्नाडेट आणि तिचा नवरा काबेरा वेदस्ती तुत्सी समाजाशी जोडलेले आहेत . त्याच वेळी, त्याचा शेजारी ग्रेटियन न्यामिनानी हा हुतू समाजाचा होता. ते दोघेही शेतकरी होते. हे हत्याकांड संपल्यानंतर तुत्सी समाजाचे लोक सत्तेवर आले. त्यानंतर हत्येमध्ये सहभागी लाखो लोकांना ताब्यात घेण्यात आले. ग्रेटियनलाही ताब्यात घेण्यात आले.

2004 मध्ये, कोर्टात, ग्रेटियनने बर्नाडेटसमोर तिच्या पतीची हत्या केल्याचे कबूल केले. यासाठी त्याने बर्नाडेटची माफीही मागितली होती. त्याच वेळी, महिलेने ग्रेटियनला देखील माफ केले. यामुळे ग्रेटियनला १९ वर्षांची शिक्षा झाली नाही आणि त्याला दोन वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर सोडण्यात आले. नंतर ग्रेटियन 10 वर्षे नजरकैदेत राहिला. या दरम्यान दोन्ही कुटुंबातील जवळीक वाढली होती. ग्रेटियनची मुलगी यांकुरिजे डोनाटा बर्नाडेटच्या घरी येऊन तिची मदत करत होती.

नरसंहारा दरम्यान ती ९ वर्षांची होती. तर बर्नाडेटचा मुलगा अफ्रेड तेव्हा १४ वर्षांचा होता. यांकुरिजे डोनाटा म्हणाली – मी अफ्रेडच्या आईला मदत करायची. मला वाटतं म्हणूनच तो माझ्या प्रेमात पडला. त्याच वेळी, बर्नाडेट म्हणाल्या की, यांकुरीजेला माहित आहे की, तिच्या वडिलांनी माझ्या नवऱ्याची हत्या केली आहे. असे असूनही ती माझ्या मदतीला यायची. मला तिचे स्वच्छ मन आणि वागणूक आवडली. त्यामुळे मी तिला माझी सून होण्यापासून रोखू शकलो नाही. त्यानंतर 2008 मध्ये दोघांनी लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT