अहमदनगर : गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत (mosque) आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर राजकीय वर्तुळात भोंग्यांच्या मुद्यावरुन टीका-टीप्पणीला सुरुवात झाली. राज यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. मात्र, काही दिवसांपूर्वी ठाण्यात झालेल्या उत्तरसभेत राज ठाकरे यांनी टीकाकारांन जोरदार प्रत्युत्तर दिलं. ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवावेच लागतील नाहीतर दुप्पट आवाजाने मनसेकडून हनुमान चालीसा (Hanuman chalisa) लावली जाईल, असा अल्टीमेटम ठाकरे यांनी दिलाय. त्यानंतर भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं आणि नव्या वादाला तोंड फुटलं. भोंग्याचा मुद्दा दिवसेंदिवस गाजत असून राजकीय नेतेमंडळी याविषयी प्रतिक्रिया देत आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही भोंग्याबाबत भाष्य केलं आहे. राज्यातील समस्या, वाढती महागाई या सर्वांचा आपल्याला विसर पडला असून भोंगा लावावा की नाही लावावा ? कुणाला हनुमान चालीसा येते की नाही ? ज्याला हनुमान चालिसा येते तो देशप्रेमी, नाही येत तो देशद्रोही, अशी खोचक टीका नाव न घेता धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर केलीय.
तसंच भोंग्याच्या विषयावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला. भोंग्यांचा विषय हा भाजपचा ग्रँड प्लॅन आहे. भाजपच्यावतीने जाणूनबूजन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम सुरु आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की, मुख्यमंत्री आहेत हे पाहीलं पाहीजे. असा सवाल करत चव्हाण यांनी भाजपवर टीका केली होती. त्यामुळे भोंग्यांच्या विषयावर महाविकास आघाडी सरकारच्या नेते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे भोंग्यांबद्दल बोलताना म्हणाले की, सध्या राज्यात काय सुरू आहे, असा प्रश्न पडतो. आज आपण माहागाई किती झाली आहे ? ते विसरलो आहोत. राज्यात काय समस्यांबाबतही आपल्याला विसर पडला आहे. राज्यात काय सुरु आहे, तर भोंगा लावावा की, नाही लागावा ? कुणाला हनुमान चालीसा येती की, नाही येत ? ज्याला हनुमान चालिसा येते तो देशप्रेमी, नाही येत तो देशद्रोही. अशा शब्दात मुंडेनी भोंग्याच्या विषयावर भाष्य केलंय. ते अहमदनगरच्या कर्जत येथे बोलत होते.
Edited By- Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.