India Pakistan Tension update Saam tv
देश विदेश

India Pakistan Tension : पाकच्या विनाशाचा काऊंटडाऊन सुरू, युद्धाची तयारी शेवटच्या टप्प्यात? वाचा स्पेशल रिपोर्ट

India Pakistan Tension update : पहलागाम हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी पाकला निर्वाणीचा इशारा देत, दहशतवादाचा खात्मा करण्याची भीष्मप्रतिज्ञा घेतली. त्यामुळे आता पाकच्या विनाशाचा काऊंटडाऊन सुरु झालाय. त्यामुळेच पाकची भीतीनं चांगलीच तंतरलीय. नेमकं भारत- पाक तणावामुळे काय सुरुय. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे भारत-पाकिस्तान युद्ध अटळ आहे. त्याच पार्श्वभूमीवर नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. भारतीय नौदल कराची बंदराजवळ युद्धअभ्यास करत असताना ही भेट झालीय. त्यात आता वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनीही पंतप्रधानांची भेट घेतलीय. तणावाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालयं. त्यात भारत कोणत्याही क्षणी हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानची तंतरलीय.. त्यामुळेच पाकिस्तानने तातडीने संसदेची बैठक बोलावलीय..

पाकिस्तानची तंतरली, बैठक बोलावली

पाकिस्तानी संसदेची इस्लामाबादमध्ये आपत्कालीन बैठक

राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्यास आपत्कालीन बैठक बोलावली जाते

सर्व पक्षांचे नेते, सुरक्षा तज्ञ आणि मंत्री उपस्थित राहतील

बैठकीत भारतासोबतच्या तणावावर चर्चा होण्याची शक्यता

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकची पाणी कोंडी, आर्थिक कोंडी केलीय. त्यातच भारतीय सैन्याला दारुगोळा पुरवठा करणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरीमधल्या कामगारांच्या सुट्ट्या ही रद्द करण्यात आल्यात. कामगारांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेत.

भारतानं आता युद्धाची पक्की तयारी केलीय. ज्यामुळे पाक नेत्यांची झोप उडालीय. पाकची एकएका मार्गानं कोंडी करून भारत प्रहार करतोय. मात्र पाकच्या मूळावर शेवटचा घाव कधी ? कुठे ? आणि कसा घातला जातो? याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT