Coronavirus cases in UK Latest Update News Saam TV
देश विदेश

इंग्लंडमध्ये कोरोनाचा विस्फोट, जून अखेरीस २३ लाख पॉझिटिव्ह; सर्वांना डोकेदुखी

जूनच्या अखेरच्या आठवड्यात जवळपास २३ लाख लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे.

Nandkumar Joshi

लंडन: जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वेगाने वाढत आहे. लसीकरणामुळं कोविड १९ आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये सर्दी, खोकला आणि सौम्य ताप अशी लक्षणे दिसून येत आहेत. त्याचवेळी ब्रिटनमध्ये एका आठवड्यातच कोविड १९ रुग्णांची संख्या जवळपास एक तृतीयांशने वाढली आहे. नवीन कोरोना रुग्णांमध्ये सामान्य लक्षणे आढळून आल्याचे रिपोर्टमध्ये समोर आले आहे. (England Corona update news)

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ सरकारच्या ज्युबिली सोहळ्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र सध्या आहे. जूनच्या अखेरच्या आठवड्यात जवळपास २३ लाख लोकांना कोरोना (Corona) संसर्ग झाला आहे. कोविड अॅनालिसिस अॅप 'झेडओई' एका रिपोर्टनुसार, बहुतांश कोरोना रुग्ण डोकेदुखीने त्रस्त आहेत.

ओएनएस डेटानुसार, सन २०२० मध्ये इंग्लंडमध्ये (England) ०.१ टक्क्याहून कमी नागरिकांना कोविड १९ चा संसर्ग झाला. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तर २०२१ मध्ये हाच दर १.५७ टक्के इतका होता. आता यावर्षी इंग्लंडमध्ये जवळपास ३.३५ टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

जूनच्या अखेरीस इंग्लंडमध्ये ८९२८ कोरोनाबाधित (Covid 19) रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. मागील आठवड्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६४०१ इतकी होती. ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट बीए.४ आणि बीए.५ हे कोरोना रुग्णांच्या वाढीस कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.

झेडओई कोविड स्टडी अॅपचा वापर हे वॉलंटियर्स ग्रुप करत असून, त्यात लोकांची सविस्तर आरोग्यविषयक माहिती अपडेट केली जाते. यावरून संबंधित व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आहेत की नाहीत याची माहिती मिळते. या अॅपच्या डेटाचं विश्लेषण हे किंग्ज कॉलेज लंडनमधील संशोधक करतात. ते संपूर्ण यूकेमध्ये कोविड रुग्णांवर लक्ष ठेवून असतात. कोरोनामुळे कोणते भाग हायरिस्क झोनमध्ये आहे, अशी माहितीही या अॅपच्या माध्यमातून मिळते.

(व्हिडिओ पाहा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

SCROLL FOR NEXT