PM मोदींची मोठी घोषणा! कोविड'मध्ये अनाथ झालेल्या मुलांसाठी 'पीएम केअर फॉर चिल्ड्रन' योजना

अनाथ मुलांना शिक्षणासाठी मिळणार कर्ज.
Pm Narendra Modi latest Scheme, PM cares for children scheme launched
Pm Narendra Modi latest Scheme, PM cares for children scheme launchedSaam Tv
Published On

वी दिल्ली : कोरोना (Corona) काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एक नवी योजना सुरु केले आहे. ' पीएम केअर फॉर चिल्ड्रन' अस या योजनेचे नाव आहे. या योजनेद्वारो त्या मुलांना मदत केली जाणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये या योजनेची घोषणा केली. या योजनेचे पासबुक तसेच आयुष्यमान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत, आरोग्य कार्ड देखील देण्यात आले. (PM cares for children scheme launched)

'ज्यांनी कोरोनामुळे आपल्या आई, वडिलांना गमावले आहे. त्यांच्या आयुष्यात काय बदल झाले असतील. त्यांनी किती कठीण काळात असतील हे मला माहीत आहे. त्यांचा रोजचा संघर्ष आहे, आज जी मुलं आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासाठी हा कार्यक्रम होत आहे, त्यांच्या वेदना शब्दात मांडणं कठीण आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) म्हणाले.

Pm Narendra Modi latest Scheme, PM cares for children scheme launched
UPSC 2021 Result: यूपीएससीत मुलींची बाजी, श्रुती शर्मा देशात अव्वल

कर्जाची सुविधा

या मुलांना जर प्रोफेशनल कोर्स किंवा शिक्षणासाठी कर्जाची गरज असेलतर त्यांनी 'पीएम केअर फॉर चिल्ड्रन' या योजनेतून कर्ज मिळू शकते. इतर दैनंदिन गरजांसाठी व इतर योजनांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी दरमहा ४ हजार रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा मागिल वर्षी केली होती. अगोदर या योजनेचा लाभ घेण्याची तारीख ३१ डिसेंबर २०२१ होती. पण पुढं याची मुदत वाढवून २८ फेब्रुवारी केली.

Pm Narendra Modi latest Scheme, PM cares for children scheme launched
घरगुती भांडणातून राग अनावर; पतीने दुसऱ्या पत्नीसोबत केलं भयावह कृत्य

८ वर्षांपूर्वी देशाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. आज आमचे सरकार ८ वर्षे पूर्ण करत असताना देशाचा आत्मविश्वास, देशवासीयांचा स्वत:वरचा विश्वास अभूतपूर्व आहे. भ्रष्टाचार, हजारो कोटींचे घोटाळे, घराणेशाही, देशभर पसरलेल्या दहशतवादी संघटना, प्रादेशिक भेदभाव, २०१४ पूर्वी ज्या दुष्टचक्रात देश अडकला होता, त्यातून देश बाहेर पडत आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

'आमच्या सरकारने तंत्रज्ञानाचा वापर वाढवून गरिबांना त्यांचे अधिकार दिले. आता गरिबांना माहित आहे, त्यांना त्यांच्या योजना मिळणार आहेत, विश्वास वाढवण्यासाठी आमचे सरकार आता १०० टक्के सक्षमीकरणाची मोहीम राबवत असल्याचेही मोदी (Narendra Modi) म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com