UPSC 2021 Result: यूपीएससीत मुलींची बाजी, श्रुती शर्मा देशात अव्वल

यंदाच्या यूपीएससी परीक्षेत पहिल्या तीनमध्ये मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
UPSC 2021 exam result
UPSC 2021 exam resultब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आज, ३० मे रोजी जाहीर झाला आहे. हा निकाल पाहण्यासाठी आपण upsc.gov.in या सांकेतिक स्थळाला भेट देऊ शकतो.

हे देखील पहा -

ही परीक्षा अंत्यत कठीण जरी असली तरी, यंदाच्या यूपीएससी (Upsc) परीक्षेत टॉप तीनमध्ये मुलींचा वरचष्मा असल्याचे दिसून येते. नुकत्याच जाहीर झालेल्या नागरी सेवा परीक्षा २०२१ च्या अंतिम निकालात श्रुती शर्माने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अकिंता अग्रवाल व तिसऱ्या क्रमांकावर गामिनी सिंगला आहे. श्रुती ही सेंट स्टीफन्स कॉलेज (Collage) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे. तसेच ती जामिया मिलिया इस्लामिया या कोचिंग क्लासेसमधून नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होती.

UPSC 2021 exam result
शंभर कोटींची उलाढाल आली वीस कोटींवर, शिक्षण पंढरीच्या अर्थकारणाला लागली घरघर

UPSC CSE प्राथमिक परीक्षा ही १० ऑक्टोबर २०२१ रोजी झाली असून तिचा निकाल निकाल २९ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षा (Exam) ही ७ ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत घेण्यात आली आणि त्याचा निकाल हा १७ मार्च २०२२ रोजी घोषित केला गेला. तसेच, ५ एप्रिलपासून सुरू झालेल्या या परिक्षेचा २६ मे रोजी संपलेल्या परीक्षेच्या मुलाखतीची ही शेवटची फेरी होती. त्यात श्रुती शर्माने बाजी मारली आहे.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com