Corona Update  Saam Tv
देश विदेश

India Corona Virus News: सावधान! देशात कोरोनाचा वेग वाढला; गेल्या २४ तासांतील आकडेवारी धडकी भरवणारी

Corona Virus In India : मागील काही दिवसांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Corona Virus In India : मागील काही दिवसांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संखेत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. अशातच गेल्या २४ तासांत धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दिवसभरात देशात कोरोनाचे ४ हजार ४३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. (Latest Marathi News)

चिंताजनक बाब म्हणजे या कालावधीत १५ रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. देशात तब्बल १६३ दिवसानंतर ४ हजारांहून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या २४ तासांत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र आणि केरळमध्ये प्रत्येकी ४-४ रुग्ण आणि छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी १-१ रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना संसर्गामुळे (Corona Virus) देशात आतापर्यंत एकूण ५ लाख ३० हजार ९१६ मृत्यू झाले आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत ४ हजारांहून अधिक आढळून आलेल्या रुग्णांमुळे आता देशातील कोरोना रुग्णांची सक्रीय रुग्णसंख्या २३,०९१ वर पोहचली आहे.

दिल्ली, महाराष्ट्रात कोरोनाचा वेग वाढला

बुधवारी दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून आली. दिल्लीत २४ तासांत ५०९ लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे दिल्लीतील कोरोना पॉझिटिव्ह दर २६.५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. एका दिवसापूर्वी हा पॉझिटीव्हिटी दर १५.६४ टक्के इतका होता. म्हणजेच, २४ तासांत पॉझिटिव्हिटी दर १०.९ टक्क्यांनी वाढला आहे.

दरम्यान, दिल्लीत कोरोनामुळे एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. दिल्लीत सध्या कोरोनाचे १ हजार ७९५ सक्रिय रुग्ण आहेत. दुसरीकडे दिल्लीपाठोमाठ महाराष्ट्रातही कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय ५६९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील (Maharashtra Corona) सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मुंबईत आहे. गेल्या २४ तासांत येथे २११ नवे रुग्ण आणि एक मृत्यू नोंदवला गेला, तर दुसरा मृत्यू पुण्यात झाला. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसचा मृत्यू दर १.८२ टक्के आहे.

भारतात सध्या कोरोना व्हायरससोबतच H3N2 चा संसर्गही वाढताना दिसत आहे. वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. तसेच सोशल डिस्टंसिग पाळा आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. घाबरुन जाणू नका, तर काळजी घ्या, असा सल्ला आरोग्य विभागानं दिला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT