देशभरात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने लोकांचं टेन्शन वाढलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 चे नवीन २१ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 चा पहिला रुग्ण ऑगस्ट महिन्यात लक्जमबर्ग या भागात आढळला. (Latest Marathi News)
नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी म्हटलं की, मंगळवारी १९ डिसेंबर रोजी कोरोनाचे ५०० रुग्ण आढळले. तर गेल्या दोन आठवड्यात कोरोनामुळे १६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या रुग्णांना आधीपासूनच गंभीर आजार होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'देशात कोरोनाचे २३०० सक्रिय रुग्ण आढळले आहेत. त्यात कोरोना व्हेरिएंट JN.1 चे २१ रुग्ण आहेत. या कोरोना व्हेरिएंटचा पहिला रुग्ण ऑगस्ट महिन्याच्या लक्जमबर्ग येथे आढळला. कोरोनाचा हा व्हेरिएंट हळूहळू ३६ ते ४० देशात पसरत चालला आहे. मात्र, या व्हेरिएंटला लोकांनी घाबरून जाऊ नये, मात्र आपण सतर्क राहिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
कोरोनाचे गेल्या २४ तासांत केरळमध्ये २९२, तामिळनाडू १३, महाराष्ट्र ११, कर्नाटक ९, तेलंगाणा आणि पुडुच्चेरीत ४ रुग्ण आढळले आहेत. दिल्ली आणि गुजरातमध्ये ३, पंजाब आणि गोव्यात १ रुग्ण आढळला आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे की, 'मंगळवारी १९ डिसेंबर रोजी कोरोनाच्या 'जेएन. 1'ला या व्हेरिएंटला 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' असं म्हणण्यात आलं आहे. तसेच त्यांनी या व्हेरिएंटपासून जास्त धोका नसल्याचं म्हटलं आहे.
देशाच्या केरळमधील तिरुवनंतरपुरम जिल्ह्यातील काराकुलममध्ये ७८ वर्षीय महिलेमध्ये Corona JN.1 व्हेरिएंट आढळून आला होता. हा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट असलेल्या पिरोलापासून तयार झाल्याचे सांगण्यात आलं आहे.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट हा या आधी कोरोना झाला आहे किंवा लस घेतलेल्यांनाही संक्रमण होण्याची शक्यता आहे. या कोरोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, नाक गळणे, घसादुखी, गॅस्ट्रो, डोकेदुखी लक्षणे दिसून येतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.