अहमदाबाद : कोरोनाने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. भारतात केंद्र सरकारने देखील हालचाली वाढवल्या आहे. मात्र चीनमधील स्थिती हाताबाहेर जाण्यास कारणीभूत ठरलेल्या कोरोनाच्या BF7 व्हेरिएंट दोन रुग्ण गुजरातमध्ये आढळले आहेत.
गुजरातच्या वडोदरा येथे पहिल्या BF7 रुग्णांची नोंद झाली आहे. बाधित महिला एनआरआय असल्याची माहिती मिळत आहे. सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगला पाठवण्यात आले आहेत. (Latest Marathi News)
गुजरातमध्ये आणखी दोन केसेस समोर आल्या आहेत, ज्याबद्दल त्यांनाही BF7 ची लागण झाल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही. सॅम्पल्स पुढील टेस्टसाठी पाठवण्यात आले आहेत.
देशात BF7चे रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ऑक्टोबरमध्येही एक रुग्ण आढळला होता. पण सध्याची चीनची परिस्थितीत पाहता भारतातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Corona Virus)
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्व संबंधितांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत, असं देखील त्यांनी सांगितलं.
सध्या भारतात कोरोना नियंत्रणात आहे, मात्र भविष्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू नये यासाठी तयारी सुरू झाली आहे.केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दर आठवड्याला कोरोनाची रिव्ह्युव्ह मिटिंग घेणार असल्याचंही म्हटलं आहे. तर महत्त्चाचं म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला केंद्र सरकाने दिला आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.