India Corona Update Saam Tv
देश विदेश

India Corona Update: देशात कोरोनाचा वेग मंदावला; 34,113 नवे रुग्ण समोर, 346 रुग्णांचा मृत्यू

देशात मागील महिन्यात कोरोनाचा वाढलेला वेग आता मंदावताना दिसून येत आहेत. देशात सोमवारी 34,113 कोरोनाची (Corona) नवीन प्रकरणे आढळून आली आहेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात मागील महिन्यात कोरोनाचा वाढलेला वेग आता मंदावताना दिसून येत आहेत. देशात सोमवारी 34,113 कोरोनाची (Corona) नवीन प्रकरणे आढळून आली असून, एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 4,26,65,534 वर पोहोचली आहे, तर 37 दिवसांनंतर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या पाच लाख पेक्षा कमी आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Ministry Of Health) सकाळी 8 वाजेपर्यंतच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, कोविड-19 चे दैनंदिन रुग्ण सलग आठव्या दिवशी एक लाखापेक्षा कमी आहेत. या आजारामुळे आणखी 346 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 5,09,011 झाली आहे.

मंत्रालयाने पुढे सांगितले की, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 4,78,882 वर आली आहे. जी संसर्गाच्या एकूण प्रकरणांच्या 1.12 टक्के आहे. कोविड-19 मधून बरे होण्याचा दर 97.68 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 58,163 रुग्णांची घट नोंदवण्यात आली आहे.

हे देखील पहा-

आकडेवारीनुसार, संसर्गाचे दररोजचे प्रमाण 3.19 टक्के आहे. साप्ताहिक संसर्ग दर 3.99 टक्के होता. या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या 4,16,77,641 झाली आहे. तर, मृत्यू दर 1.19 टक्के नोंदवला गेला आहे. देशव्यापी अँटी-कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत (Vaccination Drive In India) आतापर्यंत 172.95 कोटींहून अधिक डोस (Covid Vaccination) देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

Amruta Dhongade: अमृताचा बोल्डनेस पाहून तुम्हालाही भरेल हुडहुडी

Param Sundari vs Baaghi 4 : सिद्धार्थ मल्होत्रा अन् टायगर श्रॉफमध्ये कांटे की टक्कर, 'बागी ४'नं ओपनिंग डेलाच केली बक्कळ कमाई

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT