coronavirus Saam Tv
देश विदेश

CoronaVirus: चीननंतर आता दक्षिण कोरियात कोरोनाचा उद्रेक

चीनमध्ये परत एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाल्यामुले जगभरामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: चीनमध्ये परत एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाल्यामुले जगभरामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. यातच आता दक्षिण कोरियामध्ये (South Korea) देखील कोरोनाचा उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे. दक्षिण कोरियामध्ये एकाच दिवसात तब्बल ४ लाख कोरोनाची (Corona) रुग्णसंख्या वाढली आहे. कोरियामध्ये वाढलेल्या या रुग्णसंख्येला ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंट जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्ताच्या माहितीनुसार, त्या देशात बुधवारी ४,००,०७१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (Corona eruption South Korea after China)

हे देखील पहा-

मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यानंतर एकाच दिवसामध्ये झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. स्थानिक पातळीवर कोरोनाचा (Corona) संसर्ग झाल्याने रुग्णसंख्येमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्या अगोदर मंगळवारी दक्षिण कोरियामध्ये २९३ मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. चीननंतर (China) आता दक्षिण कोरियामध्ये देखील कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर जगभरात कोरोनाची चौथी लाट येणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. या दरम्यान चीनच्या जिलीन प्रांताची राजधानी चांगचुनमध्ये शुक्रवारपासून लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला आहे.

या शहरात ९० लाख नागरिकांना एमर्ज्नसी अलर्टनंतर घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. शेडोंगमधील युचेंगमध्ये देखील लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले होते. युचेंगमध्ये ५ लाख नागरिक राहत आहेत. सध्या चीनच्या ३ शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे २,६५,००,००० नागरिकांना घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT