India Corona Update Saam Tv
देश विदेश

India Corona Virus Update: भीती वाढली! देशात 24 तासांत 12 हजार पार रुग्णांची नोंद, 42 जणांचा मृत्यू

Latest Corona News: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या (Corona Patient) लक्षात घेता सरकारसोबतच सर्वांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Priya More

Delhi News: देशावर असलेले कोरोनाचे (Corona) सावट आणखी गडद होत चालले आहे. कोरोनाचा (Corona Virus) वेग वाढतच चालला असून रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. रोज कोरोना रुग्णांची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. गेल्या 24 तासांत देशामध्ये 12 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या (Corona Patient) लक्षात घेता सरकारसोबतच सर्वांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, देशामध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेले 12,193 नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 67,556 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांत 42 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशात आतापर्यंत 5,31,300 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या 24 तासांत 10,765 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 24 तासांमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांमधील 10 रुग्ण हे एकट्या केरळमधील आहेत. देशामध्ये गुरुवारी 11,692 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. गुरुवारची आकडेवारी लक्षात घेता शुक्रवारची कोरोना रुग्णांची आकडेवारी ही किंचित जास्त आहे. गेल्या काही दिवसांची आकडेवारी पाहता रुग्णसंख्या कमी न होता वाढतच चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

यावर्षी 19 एप्रिलला सर्वाधिक 12, 591 कोरोना रुग्ण आढळले होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून संसर्गाच्या रुग्णांमध्ये घट झाली होती. पण 18 एप्रिलला 10,542, 17 एप्रिलला 7,633, 16 एप्रिलला 9,111, 15 एप्रिलला 10,093 आणि 14 एप्रिलला 10,753 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.

गेल्या 24 तासांत संसर्ग झालेल्यांपैकी 7,500 रुग्णांची आकडेवारी ही फक्त पाच राज्यांतील आहेत. यामध्ये केरळ, दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासांत 2,413 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 3,013 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 13 जणांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Dharmendra : ही-मॅन धर्मेंद्रचे सुपरहिट डायलॉग्स; आजही आहेत चाहत्यांच्या ओठांवर

Nashik Tourism : हिवाळ्यात करा किल्ल्यावर भटकंती, नाशिकमध्ये लपलंय ऐतिहासिक ठिकाण

Delhi Bomb Blast : पार्किंगमध्ये कार ३ तास, ६.२२ ला निघाली, यू-टर्न घेतला अन्.. राजधानीत नेमकं काय काय घडलं?

Actor Dharmendra Networth: अभिनेते धर्मेंद्र यांची संपत्ती किती? आकडा वाचून थक्क व्हाल

Delhi car Blast Live updates : जम्मू काश्मीरमध्ये आमिर आणि उमर या दोन भावांना घेतलं ताब्यात, चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT