China Covid News  Saam Tv
देश विदेश

China Covid : चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा कहर; नवीन रुग्णांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ

चीनमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत

Vishal Gangurde

China Covid Update : चीनमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. चीनमध्ये कोरोना महामारीची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी देखील कोरोनाची स्थिती मान्य करत कोरोनाचे आव्हानही मान्य केले आहे. (Latest Marathi News)

चीनमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले तरी रुग्णांचा अधिकृत आकडा अद्याप समोर आला नाही. जागतिक आरोग्य संघटनेने चीनची पोलखोल केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आठवड्याच्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये एका आठवड्यात नव्या कोरोना रुग्णात ५० टक्क्यांनी वाढले आहेत. रिपोर्टनुसार, २६ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान कोरोनाचे २.१८ लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १२ ते १८ डिसेंबर दरम्यान १.४७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यानुसार चीनमध्ये कोरोना रुग्ण ४८ टक्क्यांनी वाढले आहेत.

चीन कोरोना रुग्णांचे मृत्यूचे आकडे देत आहेत, ते फारच कमी आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, २६ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत चीनमध्ये ६४८ लोकांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त चीनमध्ये रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ४८ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या आठवड्यात चीनच्या रुग्णालयात साडे बावीस हजार रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते.

दरम्यान, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी नूतन वर्षाच्या निमित्ताने संबोधित करताना चीनमधील कोरोना महामारीची परिस्थिती मान्य केली होती. जिनपिंग म्हणाले, 'कोरोना विरोधात लढताना आपण एका नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे'.

'कोरोना महामारी आजही मोठं आव्हान आहे. यावेळी जिनपिंग यांनी त्यांच्या कोरोना धोरणाचं कौतुक केलं होतं. कोरोना महामारीत आपण नागरिकांच्या जीवनाना अधिक प्राधान्य दिलं आहे. विज्ञानावर आधारित नीतीचा वापर करून लोकांचे प्राण वाचविण्यासाठी महत्वाचं पाऊल उचललं, असे शी जिनपिंग म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar : वसई-विरारमधील ७ सुंदर पिकनिक स्पॉट्स, वीकेंडला कुटुंबासोबत करा धमाल, मजा-मस्ती

राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; १० सणांच्या अग्रिम रकमेत मोठी वाढ

Maharashtra News Live Update: ऐन दुष्काळात उच्च व तंत्रशिक्षण विभागाची उधळपट्टी

Paithani Saree Designs For Womens: महिलांसाठी पैठणी साड्यांचे सुंदर डिझाईन्स, लेटेस्ट 5 पॅटर्न्स

Cooking Tips : चपात्या तासनतास मऊ आणि लुसलुशीत राहण्यासाठी फॉलो करा या सोप्या टीप्स

SCROLL FOR NEXT