Manasvi Choudhary
दिवाळी या सणाला महिला अस्सल पारंपारिक लूक करतात. तुम्हालाही मराठमोळा लूक करायचा असेल तर पैठणी साडी निवडा.
पैठणी साडीचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत ते तुम्ही खास दिवाळीसाठी निवडू शकता.
मुनिया पैठणी सध्या लोकप्रिय आहे. या पैठणी साडीवर पोपटाची बारीक नक्षीकाम केलेले असते. हिरव्या आणि लाल रंगामध्ये पैठणी साडी असते.
चंद्रकोर ही महाराष्ट्रीयन संस्कृतीतील स्त्रीत्वाचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानली जाते. साडीच्या पल्लूवर किंवा संपूर्ण अंगावर चंद्रकोरीच्या आकाराची नक्षी असणारी चंद्रकोर पैठणी सध्या महिलांमध्ये प्रचंड ट्रेंडमध्ये आहे.
ज्यांना अत्यंत शाही आणि भव्य डिझाईन आवडते, त्यांच्यासाठी राजहंस पैठणी बेस्ट आहे. साडीच्या पदरावर राजहंसाची डिझाईन असते त्यामुळे साडी सुंदर दिसते.
शिवशाही पैठणी तुम्ही खास दिवाळीसाठी निवडू शकता. हलक्या वजनाची, सॉफ्ट सिल्क तुम्ही शिवशाही पैठणी साडी आहे.
ज्यांना साधी पण पैठणी साडी नेसायची असेल त्यांनी नारायण पेठ पैठणी नेसा. या साडीला रुंद जरीची बॉर्डर आणि पदरावर सुंदर डिझाईन असते.