XE Variant symptoms, Corona XE Variant News, Corona Latest News in Marathi  Saam Tv
देश विदेश

कोरोनानं पुन्हा टेन्शन वाढवलं; २४ तासांत आढळली मोठी रुग्णसंख्या

Corona Cases In India : मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली: मागील काही महिन्यांपासून कमी झालेली कोरोना (Corona) रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढण्यास सुरूवात झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. वाढत्या संसर्गामुळे (Corona Cases) सर्वसामान्यांची तसेच सरकारची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरूवारी जाहीर केलेल्या आकडेवाडीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ((Corona Cases In India) तब्बल ३३०३ नवे रुग्ण आढळले असून यादरम्यान ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. (Corona Cases In India 28 April 3303 New Covid 19 Cases 39 Death Last 24 Hours)

दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत २,५६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ९८० इतकी झाली आहे. अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल ५ लाख २३ हजार ६९३ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. (Corona Latest News in Marathi)

दरम्यान, बुधवारी देशात २ हजार ९२७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. बुधवारच्या तुलनेत गुरूवारी आढळून आलेली रुग्णसंख्या ही सर्वाधिक आहे. चिंताजनक बाब म्हणजे यातील ४० टक्के कोरोना रुग्ण हे एकट्या दिल्लीमधील आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे १,३६७ नवीन रुग्ण आढळले आहेत. ६ फेब्रुवारीनंतरची ही सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची सक्रिय संख्या ४,८०० वर पोहचली आहे.

महाराष्ट्रात २४ तासांत कोरोनाचे १८६ रुग्ण

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १८६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे यादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. राज्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७८,७७,२६४ वर पोहोचली आहे.दुसरीकडे, मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, मुंबईतही कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ११२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police Income Tax Investigation: इन्कम टॅक्स विभागानं वाढवलं टेन्शन, थेट 1050 पोलिसांना नोटीस, पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra Live News Update : मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सुरक्षेत वाढ

Marwadi Garlic Chutney: वरण भातासोबत काहीतरी झणझणीत खावसं वाटतयं? मग मारवाड स्टाईल लसूण चटणी ठरेल बेस्ट

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT