महाराष्ट्र सरकारने व्हॅट का कमी केला नाही? इंधन दरवाढीवरुन केंद्रात-राज्यात जुंपली

Priyanka Chaturvedi On hardeep singh puri : सर अजून काही सांगायचे आहे का? असा खोचक टोला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांना लगावला आहे.
central petroleum minister hardeep singh puri slams to maharashtra government about fuel price hike
central petroleum minister hardeep singh puri slams to maharashtra government about fuel price hikeSaam Tv
Published On

मुंबई: राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. एकीकडे राज्य सरकार केंद्राला दोष देते तर केंद्र सरकार राज्याला दोष देते. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या (Fuel Price Hike) किंमतीबाबत केंद्र आणि राज्यात सुप्त संघर्ष सुरु आहे. अशातच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी या वादात उडी घेतली असून महाराष्ट्राला इंधनामधून मिळालेली रक्कम सांगत राज्य सरकारवर टीका केली आहे. (central petroleum minister hardeep singh puri slams to maharashtra government about fuel price hike)

हे देखील पाहा -

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की सत्य दुखावते, परंतु तथ्य खरं बोलतात. महाराष्ट्र सरकारने 2018 पासून इंधन कर म्हणून ₹79,412 कोटी जमा केले आहेत आणि यावर्षी 33,000 कोटी जमा होण्याची अपेक्षा आहे. (एकूण ₹1,12,757 कोटी कर). महाराष्ट्र सरकारने लोकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट का कमी केला नाही? असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता पुन्हा केंद्र आणि राज्य वाद सुरु होऊ शकतो.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रावर आरोप केला होता की, केंद्र सरकारने आमचे जीएसटीचे पैसे थकवले आहे. केंद्राला महाराष्ट्रातून सर्वाधिक महसूल मिळतो. पण, महाराष्ट्रालाच सापत्न वागणूक दिली जाते, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला. पंतप्रधान मोदींनी इंधन दरवाढीची जबाबदारी राज्यांवर टाकली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मोदींना कठोर शब्दात प्रत्युत्तर दिले.

प्रियंका चतुर्वेदींचं प्रत्युत्तर

दरम्यान शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की, प्रत्यक्ष कराद्वारे महाराष्ट्राचे योगदान: 38.3% आहे. तर GST 15% आहे. राज्याची केंद्राकडे जीएसटीची थकबाकी: 26500 कोटी आहे. केंद्राने अद्याप आर्थिक वर्ष 2022 साठी राज्यांना 78,704 कोटी रुपयांची जीएसटी भरपाई देणे बाकी आहे. केंद्रीय अबकारी कर संकलन 27 लाख कोटी आहे असं ट्विट प्रियंका चतुर्वेदी यांनी केलं. तसंच सत्य दुखावते, तथ्य खरेच बोलतात, सर अजून काही सांगायचे आहे का? असा खोचक टोला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांना लगावला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com