Cylinder Price Hike
Cylinder Price Hike Saam Tv
देश विदेश

सर्वसामान्यांना मोठा झटका, घरगुती LPG गॅस सिलिंडर महागला

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) वाढत्या किमतींमुळे आधीच जनता हैराण आहे आणि त्यातच आता असतानाच सिलिंडरच्या (Cylinder) दरात ही वाढ झाली आहे. कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता 14.2 किलोंच्या घरगुती सिलिंडरची किंमत 999.50 रुपये झाली आहे. याआधी मार्च 2022 मध्ये घरगुती सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. जुलै 2021 पासून तब्बल 5 वेळा गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत.

हे देखील पाहा -

त्याचबरोबर या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 102 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 2355.50 रुपये झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत 2253 रुपये होती.

त्याच वेळी, 5 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत सध्या 655 रुपये आहे. 1 एप्रिल रोजी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 250 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यापूर्वी 1 मार्च रोजी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 105 रुपयांनी, तर 22 मार्चला 9 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: उन्हाळ्यात केसगळतीवर रामबाण उपाय ठरेल एरंडेल तेल; हा हेअर मास्क ठरेल फायदेशीर

Today's Marathi News Live : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी; गंगापूर धरणाची पाणी क्षमता वाढली

Petrol Diesel Rate 30th April 2024: वाहनाची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या ;राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर

Indi News: मोठी दुर्घटना! यात्रेत रथ अंगावरुन गेल्याने तिघांचा मृत्यू; कर्नाटकच्या इंडी तालुक्यातील घटना

Navi Mumbai crime : उरणमधील महिलेच्या हत्येचा उलगडा; पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT