Gyanvapi Mosque  Saam Tv
देश विदेश

'शिवलिंग' विषयी वादग्रस्त पोस्ट, MIM च्या प्रवक्त्याला अटक

सायबर क्राईमची कारवाई

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदाबाद: ज्ञानवापी वादाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद (Ahmedabad) सायबर क्राइम टीमने असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष MIM चे प्रवक्ते दानिश कुरेशी यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. दानिशवर हिंदू देवतांवर आक्षेपार्ह पोस्ट (Post) टाकल्याचा आरोप (Allegations) करण्यात येत आहे. पोलिसांनी (police) सांगितले की त्याच्या ट्विटवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा गेले असल्याचे आरोप होत आहेत. यामुळे दानिशला यांना अटक करण्यात आली आहे.

हे देखील पाहा-

सायबर क्राइमचे (Cyber ​​Crime) सहाय्यक आयुक्त जेएम यादव म्हणाले की, दानिश कुरेशी नावाच्या ट्विटर (Twitter) हँडलवरून पोस्ट केल्यानंतर त्यांची टीम युजरच्या शोधात होते. ट्विटचा मजकूर बहुसंख्य समाजाच्या भावना दुखावणारा होता. प्रथम पथकाने तांत्रिक संशोधन केले आणि नंतर दानिशला अटक करण्यात आली आहे. MIM प्रवक्त्याने ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा केल्यानंतर वादग्रस्त ट्विट केले होते.

तसेच या ट्विटमध्ये आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. दानिश कुरेशी हा शाहपूरमध्ये असल्याची माहिती सायबर क्राइम टीमला मिळाली होती, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. दानिश कुरेशीवर अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर जातीय सलोखा बिघडवणे, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच दानिशविरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्यावर नरोडा आणि पालडी पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. हिंदू धर्मगुरू ज्योतिर्नाथ स्वामी यांनी दानिशच्या पोस्टचा निषेध करत त्याला लोकांकडून कठोर शिक्षा व्हायला हवी असे म्हटले आहे. त्याचबरोबर एआयएमआयएमच्या प्रवक्त्याने हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT