Rahul Gandhi Conviction Stayed : मोदी आडनाव प्रकरणी मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर काँग्रेसनं ट्विट केलं आहे. 'यह नफरत के खिलाफ मोहब्बत की जीत हैं', अशी पोस्ट काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आली आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. गुजरातच्या कोर्टाने राहुल गांधींना शिक्षा सुनावली होती. त्यानंतर गुजरात हायकोर्टाने तो निर्णय कायम ठेवला होता. (Latest Marathi News)
राहुल गांधींना सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांना संसद सदस्यत्व बहाल करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे, असं मानलं जात आहे. दरम्यान, राहुल गांधींना सुनावलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर काँग्रेसनं ट्विट केलं आहे. हा द्वेषाविरुद्ध प्रेमाचा विजय आहे. सत्यमेव जयते. जय हिंद! असं काँग्रेसनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर काँग्रेससह वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी ट्विट केलं आहे. राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हा न्यायाचा विजय आहे. कोणतीही शक्ती जनतेचा आवाज दाबू शकत नाही, असं वेणुगोपाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आज एक चपराक लावली आहे. तुमची हुकूमशाही चालणार नाही. आता लवकरच राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करायला हवी, अशी मागणी आमदार भाई जगताप यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.