काँग्रेसने तीन आमदारांवर निलंबनाची कारवाई केली असून, आमदारकीही जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  saam tv
देश विदेश

Politics : काँग्रेसच्या तीन नेत्यांची आमदारकी जाणार, पक्षातून निलंबित, राजकीय वर्तुळात खळबळ

Congress suspends three mlas over cross voting in odisha : राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या ओडिशातील तीन आमदारांवर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठी पाऊल उचलण्यात येईल, असे पक्षाच्या राज्यातील नेतृत्वाने सांगितले आहे.

Nandkumar Joshi

राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणं काँग्रेसच्या आमदारांना चांगलंच महागात पडणार आहे. ओडिशात क्रॉस व्होटिंगमुळं राज्यसभा निवडणुकीत पराभव झाल्यानं काँग्रेसनं बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या पाठिंब्यावर उभ्या असलेले उमेदवार दिलीप रे यांना मतदान करणाऱ्या तीन आमदारांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

सनाखेमुंडी आमदार रमेश चंद्र जेना, मोहानाचे दसरथी गोमांगो आणि कटकच्या आमदार सोफिया फिरदोस अशी या काँग्रेसच्या तीन नेत्यांची नावं आहेत. या नेत्यांनी सोमवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत पक्षाने आदेश दिलेले असताना दिलीप रे यांना मतदान केले होते. या नेत्यांना पक्षाने निलंबित केले आहे. ओडिशा काँग्रेसने सोशल मीडियावर ही माहिती दिली. काँग्रेसची फसवणूक करणाऱ्यांनी देशासोबत विश्वासघात केला आहे, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आमदारांच्या निलंबनाची कारवाई संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतरच करण्यात आली आहे, असे ओडिशा काँग्रेसच्या मीडिया सेलचे प्रभारी अरबिंद दास यांनी स्पष्ट केले. या नेत्यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधी काम केले आहे. राज्यसभा निवडणुकीत सर्व आमदारांना याबाबत ताकीदही देण्यात आली होती. तरीही त्यांनी पक्षविरोधी काम केले आहे, असेही ते म्हणाले.

निलंबनाच्या कारवाईनंतर आता या नेत्यांचे विधानसभा सदस्यत्वही रद्द करण्यात येईल. यासंबंधात लवकरच आम्ही विधानसभा अध्यक्षांना नोटिस देणार आहोत, अशी माहितीही दास यांनी दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. या नेत्यांकडून ही अपेक्षा नव्हती. या आमदारांनी पक्षासोबत गद्दारी केली आहे. या नेत्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठी पावले उचलण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित नेत्यांवर केलेल्या कारवाईवर पक्षश्रेष्ठींनीही समाधान व्यक्त केले आहे. या नेत्यांविरोधात कारवाई करण्याची आवश्यकता होती, असे पक्ष नेतृत्वाचे म्हणणे आहे. या काँग्रेस आमदारांसह मुख्य विरोधी पक्ष बीजेडीच्या आठ आमदारांनीही राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केली होती. त्यामुळे विरोधी पक्षाचे उमेदवार दत्तेश्वर होता यांचा पराभव झाला. बीजेडीने दत्तेश्वर यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. दरम्यान, काँग्रेसकडून बिहार आणि हरयाणातही अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड सुरू

Carrot And Beetroot Juice For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी प्या गाजर आणि बीट ज्यूस, केस गळतीही होईल कमी

Matka Kulfi Recipe: उन्हाळ्यात घरीच बनवा थंड मलाईदार मटका कुल्फी; सोपी रेसिपी करा ट्राय

MBBS चा विद्यार्थी गोत्यात! दुबईच्या पोराला गाडी देणं पडलं महागात; मुंबईतील प्रतिकच्या मृत्यूला जबाबदार कोण?

सरकारी पत्रात भाजप आमदाराचा भूमाफिया उल्लेख; नागरिकांच्या जमिनी हडपल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT