Gaurav Vallabh Resigns ANI
देश विदेश

Gaurav Vallabh Resigns : काँग्रेसला मोठा धक्का! गौरव वल्लभ यांनी दिला पक्षाचा राजीनामा, पत्रातून सांगितली मनातील सल

Gaurav Vallabh Resigns from congress : काँग्रेसचे वरिष्ठ नेते , प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहित पक्षाविषयी मनातील सल व्यक्त केली.

Vishal Gangurde

Gaurav Vallabh Resigns from congress party :

काँग्रेसचे वरिष्ठ नेते , प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहित पक्षाविषयी मनातील सल व्यक्त केली. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गौरव वल्लभ यांचा राजीनामा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.

गौरव वल्लभ यांनी पत्रात काय म्हटलं ?

गौरव वल्लभ यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्र लिहित म्हटलं की, भावुक झालोय. मन व्यथित झालंय. खूप काही बोलू इच्छित आहे. काही सांगू इच्छित आहे. माझे संस्कार काही सांगण्यास नकार देत आहे. माझ्या बोलण्याने दुसऱ्यांना त्रास होईल. तरीही मी माझी बाजू तुमच्यासमोर मांडत आहे. मी सत्य लपवू इच्छित नाही. मी गुन्ह्याचा भागीदार होऊ शकत नाही'.

काँग्रेस प्रवक्तांनी पुढे सांगितलं की, 'मी फायनान्स विषयाचा प्राध्यापक आहे. काँग्रेसचं सदस्यत्व घेतल्यानंतर मला पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता बनविण्यात आलं. पक्षाची योग्य पद्धतीने बाजू सर्वांसमोर मांडली. पण मागील काही दिवसांपासून पक्षाची भूमिका डळमळीत झाल्याची दिसून येत आहे. मी पक्षप्रवेश केला, त्यावेळी काँग्रेस पक्ष खूप जुना पक्ष होता. तेव्हा पक्षात युवक, बुद्धीवान लोकांना आदर होता. मात्र, काही वर्षांपासून नव्या कल्पना घेऊन येणाऱ्या युवकांसोबत पक्ष व्यवस्थित वागताना दिसत नाहीये'.

'पक्ष चुकीच्या दिशेने पुढे जात आहे. पक्ष आता जातनिहाय जनगणनेविषयीची भूमिका मांडत आहे. ही मागणी हिंदू समाजाच्या विरोधी वाटत आहे. या मागणीमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. ही मागणी काँग्रेसच्या मुलभूत सिद्धांताच्या विरुद्ध आहे, असे ते म्हणाले.

'पक्ष दिशाहिन होत आहे, हे पाहवत नाही. मी सकाळ ते संध्याकाळी वेल्थ क्रिएटर लोकांना शिव्या घालू इच्छित नाही. यामुळे मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. तुमच्या मिळालेल्या स्नेहासाठी आभारी आहे, असे वल्लभ यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT