PM Narendra Modi in Mudbidri, Karnataka  SAAM TV
देश विदेश

PM Modi in Karnataka : बजरंग बली की जय...म्हणत मोदींचा काँग्रेसवर प्रहार; म्हणाले, देशविरोधी शक्तींना...

PM Narendra Modi in Mudbidri, Karnataka : कर्नाटकात पुन्हा सत्तेत येण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.

Nandkumar Joshi

PM Narendra Modi in Mudbidri, Karnataka : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सर्व शक्तीनिशी उतरला असून, पुन्हा सत्तेत येण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. कर्नाटकातील मुडबिद्री येथील प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेसवर हल्ला चढवला. देशविघातक शक्तींसोबत संगनमत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला.

'काँग्रेस देशद्रोहींसोबत संगनमत करून निवडणुकांसाठी भारताच्या विरोधात असलेल्या शक्तींची मदत घेतो. देशद्रोह्यांवरील खटले मागे घेतात आणि दहशतवाद्यांच्या समर्थकांची ढाल होतात,' असा गंभीर आरोप यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

काँग्रेस हा कर्नाटकातील शांततेचा शत्रू आहे. विकासाचा शत्रू आहे. काँग्रेस हा दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना वाचवतो आणि तुष्टीकरणाला प्रोत्साहन देतो. हीच त्यांची ओळख आहे, असाही हल्लाबोल मोदींनी केला. (Karnataka Elections 2023)

जय बजरंग बली...जयघोषानं भाषणाची सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात जय बजरंग बलीच्या जयघोषाने केली. कर्नाटकातील नागरिक काँग्रेसचा भीतीदायक चेहरा बघत आहे, असे ते म्हणाले. भारत माता की जय...बजरंग बली की जय...मी शांती आणि सद्भावनेचा संदेश देणाऱ्या सर्व मठाधिपती, संतांना श्रद्धेने नमन करतो. आज 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र घेऊन आम्ही पुढे जात आहोत, त्यामागे सर्व संतांची प्रेरणा आहे, असेही ते म्हणाले.

'जनता-जनार्दनाचा आदेश शिरसांवद्य'

'जनता-जनार्दनाचा आदेश मला शिरसांवद्य आहे. या देशातील १४० कोटी लोकच आमचा रिमोट कंट्रोल आहे. १० मे रोजी मतदान आहे. कर्नाटकाला क्रमांक १ वर नेणे हाच आमचा उद्देश आहे. कर्नाटकाला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुपर पॉवर करणे हाच भाजपचा संकल्प आहे,' असे मोदी यावेळी म्हणाले.

कर्नाटकाला औद्योगिक विकासात अव्वल स्थानी नेण्याचा प्रयत्न आहे. कर्नाटक कृषी विकासात क्रमांक १वर नेणे, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात अव्वलस्थानी नेणे हेच आमचे लक्ष्य आहे. काँग्रेसला काय हवंय? दिल्लीत त्यांचा 'शाही परिवार' बसला आहे, त्या कुटुंबासाठी कर्नाटकला एटीएम नंबर १ करायचे आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

..तर तुमचं भविष्य अस्थिर, तरुणांचा साद

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना साद घातली. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकांना त्यांनी आवाहन केले. जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, ते कर्नाटकचं भवितव्य निश्चित करणार आहेत. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवक-युवतींना आपलं करिअर करायचे असेल, आपल्या मनासारखे काम करायचे असेल तर हे काँग्रेसच्या सत्ताकाळात शक्य नाही. कर्नाटकात अस्थिरता असेल तर तुमचं भवितव्यही अस्थिर होईल, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेचे ठेकेदारांनी अर्धवट काम करून बिल काढली

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT