Rahul Gandhi claims voter fraud in Haryana Assembly elections; alleges 25 lakh votes were stolen. saam tv
देश विदेश

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

Hydrogen Bomb of Voter Scam: राहुल गांधींनी व्होटचोरीचा हायड्रोजन बॉम्ब फोडलाय.हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीत तब्बल 25 लाख मतांची चोरी कशी झाली? ब्राझीलच्या कोणत्या मॉडेलने हरियाणात २२ वेळा मतदान केलं? राहुल गांधींनी फोडलेल्या नव्या बॉम्बवरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Suprim Maskar

  • हरियाणात तब्बल 25 लाख मतांची चोरी

  • ब्राझीलच्या मॉडेलचे हरियाणात तब्बल 22 वेळा मतदान

  • एकाच बुथवर एका महिलेचे 223 वेळा मतदार म्हणून नाव

राहुल गांधींनी व्होटचोरीवरून हायड्रोजन बॉम्ब टाकलाय...हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांचा मोठा घोळ झाल्याचा आरोप केलाय. हरियाणात तब्बल 25 लाख मतांची चोरी झालीय. आणि यामुळेच काँग्रेसचा पराभव झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. आणि हाच पॅटर्न बिहार निवडणुकीत वापरण्यात येणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

व्होट चोरीचं प्रेझेंटेशन करताना राहुल गांधींनी एका तरुणीचा फोटो दाखवत मोठा गौप्यस्फोट केलाय. कधी सीमा तर कधी स्वीटी या नावानं मतदारयाद्यांमध्ये वारंवार दिसणाऱ्या ब्राझीलच्या मॉडेलनं हरियाणात तब्बल 22 वेळा मतदान केल्याचा खळबळजनक आरोप केलाय. त्यामुळे व्होट चोरीचं इंटनॅशनल कनेक्शन समोर आलंय. भाजपनं मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

एकाच बुथवर एका महिलेचे 223 वेळा मतदार म्हणून नाव आढळले. आठ मतदारांमध्ये एक फेक मतदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय. दालचंद नावाचा व्यक्ती उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये अशा दोन्ही ठिकाणी मतदान करतोय. कॅटेगिरीनुसार 5 लाख 21 हजार दुबार मतदार आहेत. 93 हजार 174 मतदारांचे मतदारयादीत पत्ते चुकीचे आहेत.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांनंतर राहुल गांधींनी असाच व्होट चोरीचा बॉम्ब फोडून निवडणुक आयोगाविरोधात हल्लाबोल केला होता.मात्र आता बिहार विधानसभा आणि महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राहुल गांधींनी हरियाणातील व्होट चोरीवर हायड्रोजन बॉम्ब टाकल्यानं आता मुद्दा पुन्हा तापलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आमदार चिखलीकर यांना भविष्यात मोठी जवाबदारी मिळणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले संकेत

भाजप प्रणित NDAला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची कारला धडक, २ जवानांसह ५ जणांचा मृत्यू

Dudhi Bhopla Sweet Dish : दुधी भोपळ्याचा हलवा तर खाल्ला असाल, मग एकदा ट्राय करा 'ही' स्वीट डिश

WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाचा भारताला जबरदस्त धक्का, WTC शर्यतीत पाकिस्ताननंही टाकलं मागे

SCROLL FOR NEXT