Congress Manifesto Saam tv
देश विदेश

Congress Manifesto : रोजगार ,महागाईपासून सुटका ते सामाजिक न्याय; लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा तयार

Congress Manifesto for lok sabha : काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी जाहीरनामा तयार केला आहे. जाहीरनामा समितीने जाहीरनाम्याची प्रत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपवली आहे.

Pramod Subhash Jagtap

Congress Manifesto News :

काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी जाहीरनामा तयार केला आहे. जाहीरनामा समितीने जाहीरनाम्याची प्रत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपवली आहे. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत जाहीरनाम्याला मंजुरी दिली जाणार आहे. या जाहीरानाम्यात ३० लाख सरकारी नोकऱ्या ते महिलांना प्रति महिना ६ हजार रुपये मदतीच्या घोषणेचा सामावेश आहे. (Latest Marathi News)

काँग्रेस कार्यकारिणीच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत या जाहीरनाम्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या जाहीरानाम्यात रोजगार, महागाईपासून सुटका आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने केंद्र सरकारमधील ३० लाख रिक्त पदांना भरण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच या जाहीरनाम्यात महिलांना प्रति महिना ६ हजार रुपये, केंद्र सरकारमधील नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण मंजूर करणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.

आरोग्य योजनेविषयी महत्वाच्या घोषणांचा या जाहीरमान्यात सामावेश आहे. मध्य प्रदेशमधील चिरंजीवी योजनेच्या आधारावर आरोग्य विमा योजनेचाही यात सामावेश असणार आहे. तर ग्रामीण भागातील मुलांना क्रीडा क्षेत्रातील स्कॉलशिप, आर्टिफिशियल इंटेलिजेन्सला प्रोत्साहन याचाही जाहीरनाम्यात सामावेश असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT