congress Saam tv
देश विदेश

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोरांनी काढला पळ

congress : काँग्रेस नेत्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.

Vishal Gangurde

भर रस्त्यात गोळीबाराचा थरार

काँग्रेस नेत्यावर गोळीबार

हल्लेखोरांच्या गोळीबारात काँग्रेस नेता गंभीर जखमी

मध्य प्रदेशच्या छतपूर जिल्ह्यात निवडणूक आणि जुन्या वैमनस्यातून काँग्रेस नेता महूम सिंह बुंदेा उर्फ हल्के राजा यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. काँग्रेस नेत्यावर गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. छतपूरच्या इमलिया तिराहजवळ हल्लेखोरांनी कार थांबवून अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात काँग्रेस नेते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात आलं आहे.

छतपूरच्या राजनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विक्रमपूर गावात ही घटना घडली आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेले नेत्याचे भाचे अभय राज सिंह बुंदेला यांच्या माहितीनुसार, हल्के राजा छतरपूरहून गावी निघाले होते. या दरम्यान २ ते ३ वाहनांमधून ७ ते ८ हल्लेखारांनी त्यांच्या कारला घेरलं. त्यानंतर हल्लेखोरांनी जवळपास ६ ते ७ राऊंड गोळीबार केला. त्यानंतर बेसबॉल बॅटनेही हल्ला केला.

हल्के राजा यांच्या दोन पाय, मांडी आणि खांद्यावर गोळी लागली आहे. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून पळ काढला. काँग्रेस नेते हल्के राजा यांना तातडीने घटनास्थळाजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तातडीने ग्वालियर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं.

नातेवाईकांनी गावातील लोकपाल सिंह बुंदेला, वीरेंद्र सिंह बुंदेला, सत्यम सिंह यांच्या सहित इतर लोकांवर गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. सर्व संशयित आरोपी एकाच पक्षातील आहेत. जुन्या वैमनस्यातून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

रुग्णालयातील डॉक्टर अनिरुद्ध चतुर्वेदी यांनी सांगितलं की, हल्के राजा यांची प्रकृती नाजूक आहे. त्यांच्या दोन्ही पायाला गोळी लागली आहे. डॉक्टरांची टीम आयसीयूमध्ये उपचार करत असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

SCROLL FOR NEXT