No Confidence Motion Saam tv
देश विदेश

No Confidence Motion: PM मोदींच्या भाषणाआधीच राहुल गांधी सभागृहातून निघून गेले, पण...; नेमकं कारण काय?

No Confidence Motion: पंतप्रधान मोदी यांचं लोकसभेत भाषण होण्याआधीच खासदार राहुल गांधी सभागृहातून निघून गेले होते. मात्र, राहुल गांधी थोड्या वेळाने सभागृहात पुन्हा आले.

Vishal Gangurde

Pm Narenda Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर बोलत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत बोलताना विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. मात्र, पंतप्रधान मोदी यांचं लोकसभेत भाषण होण्याआधीच खासदार राहुल गांधी सभागृहातून निघून गेले होते. मात्र, राहुल गांधी हे थोड्या वेळाने सभागृहात पुन्हा आले. राहुल गांधी हे सभागृहातून का निघून गेले, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Latest marathi News)

राहुल गांधी सभागृहातून का निघून गेले?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकण्यासाठी सभागृहात उपस्थित नव्हते. नियोजित कार्यक्रमांनुसार, पंतप्रधान मोदी संध्याकाळी ४ वाजता लोकसभेत निवेदन करणार होते. मोदी सभागृहात आले. मात्र, संध्याकाळी ५ वाजले तरी मोदींनी अविश्वास प्रस्तावावर निवेदन केले नाही.

त्यानंतर राहुल गांधी हे मोदींचे भाषण सुरू होण्याआधीच सभागृहातून निघून गेले. नियोजित बैठकांसाठी राहुल गांधी गेल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, काही वेळानंतर राहुल गांधी पुन्हा सभागृहात हजर झाले.

नरेंद्र मोदी देशातील गरिबीवर काय म्हणाले?

अविश्वास प्रस्तावावर नरेंद्र मोदी म्हणाले, ' संसदेच्या अधिवेशनात अनेक विधेयकं होती. देशातील गाव, गरीब, दलित, मागास आणि आदिवासी समाजातील लोकांसाठी ही विधेयकं होती. या समाजातील लोकांच्या कल्याण आणि भविष्याशी जोडलेले होते. विरोधकांना त्यांची चिंता नाही. त्यांना पक्ष महत्वाचा वाटत आहे. विरोधकांना गरिबांच्या भूकेची चिंता नाही. त्यांना सत्तेची भूक आहे'.

'आपल्या तरुणांमध्ये स्वप्न साकार करण्याची शक्ती आहे. आम्ही देशातील तरूणांना भ्रष्टाचारमुक्त सरकार , आकांक्षा आणि खूप साऱ्या संधी दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

SCROLL FOR NEXT