rahul gandhi news  Saam tv
देश विदेश

भारतात आर्थिक संकटाचं वादळ येणार? इंधन दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा

Rahul Gandhi news : देशभरात इंधनाचा भडका उडालेला असतानाच आता देशावर आणखी एक मोठं संकट घोंगावत असल्याचा इशारा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिलाय. नेमकं कोणत्या संकटाचं वादळ येणार आहे? राहुल गांधींनी नेमका काय इशारा दिलाय? पाहूयात यावरचा रिपोर्ट

Vishal Gangurde

रोहित कदम, साम टीव्ही

ऐकलंत... देशात इंधनटंचाईचं संकट गडद झालं असताना आता राहुल गांधींनी मोठा दावा केलाय. देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना राहुल गांधींनी थेट आर्थिक संकटाच्या वादळाचे संकेत दिलेत. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवरही जोरदार निशाणा साधलाय...

खरंतर, दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेदरलँडमधल्या भाषणात थेट जगातले बहुसंख्य लोक गरिबीच्या खाईत लोटली जाणार असल्याची भीती व्यक्त केली होती.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण पाहता काही दिवसात डॉलर १०० रुपयांवर जाण्याची भीती व्यक्त केली जातेय. आणि यामुळेच मोठं आर्थिक संकट देशासमोर उभं राहिलंय.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण

तारीख - 15 मे 2026

डॉलर 94.59 रुपये

16 मे 2026

डॉलर 95.96 रुपये

17 मे 2026

डॉलर 95.97 रुपये

18 मे 2026

डॉलर 96.18 रुपये

19 मे 2026

डॉलर - 96.33 रुपये

खरंतर, पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पुढील काळात इंधन दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. राहुल गांधींनी याआधीदेखील इंधन दरवाढीचे संकेत दिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा दावा करून त्यांनी भारतीयांना सावध केलंय. त्यामुळे पुढील काळात देशाला आणखी बिकट परिस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Imran Khan: इम्रान खानला देश सोडून जाण्याचे आदेश का मिळाले? अभिनेता नक्की कोणत्या देशाचा नागरिक आहे?

Milk Tea Vs Black Tea: दुधाचा की कोरा, आरोग्यासाठी कोणता चहा बेस्ट?

Maharashtra News Live Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून यवतमाळमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी

Maharashtra Politics: सहर शेखचे वडील युनूस शेख यांनी खरंच शिंदेसेनेत प्रवेश केला का? स्वत: सांगितले सत्य

भाजपला सर्वात मोठा धक्का! दोन बड्या नेत्यांसह नेते-पदाधिकाऱ्यांचा 'सपा'त प्रवेश

SCROLL FOR NEXT