Rahul Gandhi News: काँग्रेस खासदार राहुल गांधी उद्या लोकसभेच्या अधिवेशनात अविश्वास प्रस्तावावर बोलणार आहेत. राहुल गांधी उद्या पावसाळी अधिवशेनात पहिल्यांदा बोलणार आहेत. लोकसभेत आठ ऑगस्ट ते १० ऑगस्टपर्यंत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. (Latest Marathi News)
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अखेरच्या दिवशी अविश्वास प्रस्तावावर उत्तर देण्याची शक्यता आहे. विरोधकांनी मणिपूर हिंसाचार मुद्द्यावरून अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून २० जुलै रोजी संसदेत जोरदार राडा झाला होता.
राहुल गांधींना दिलासा
राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाने मोदी आडनावावरून दाखल मानहानीच्या खटल्याच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. यामुळे राहुल गांधींना पुन्हा एकदा संसदेचं सदस्यत्व मिळालं आहे.
इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत
राहुल गांधी यांना तब्बल 137 दिवसांनी संसदेत पुन्हा परतले आहेत. आज संसदेत येताना त्यांच्यासोबत त्यांची आई आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर नेते उपस्थित होते. राहुल गांधी संसदेत येताच 'इंडिया' आघाडीच्या खासदारांनी जोरदार स्वागत केले.
राहुल गांधी संसदेत पोहोचल्यानंतर महात्मा गांधींच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली आहे. तसेच यानंतर यानंतर काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांच्या खासदारांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. तसेच गांधी यांच्या समर्थनार्थ खासदारांनी घोषणाबाजीही केल्या.
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून निर्णयाचे स्वागत
मोदी आडनावावरून दाखल मानहानीच्या खटल्याच्या शिक्षेला सूप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले आहे.
'मोदी हे राहुल गांधींना घाबरतात. राहुल गांधी यांची खासदारकी निकालानंतर पाच मिनिटांत रद्द केली. ती पुन्हा बहाल करायला ४८ तास लावले. यावरून मोदी हे राहुल गांधींना घाबरतात असे दिसून येते, असं म्हणत नाना पटोले यांनी निर्णयाचे स्वागत केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.