Political News : एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढणार? शिवसेना शिंदे गटाच्या मतदारसंघात रामदास आठवलेंची फिल्डिंग

Shirdi Loksabha News : रामदास आठवले यांनी शिर्डी मतदारसंघावर दावा केल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे.
Eknath shinde Ramdas Athawale
Eknath shinde Ramdas Athawale Saam TV
Published On

प्रमोद जगताप

Political News : शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरण बदलण्याची दाट शक्यता आहे. आगीमी निवडणुकांमध्ये जागावाटपात शिवसेना (शिंदे गट)-भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची तारेवरची कसरत होणार आहे. रिपाइंचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आता थेट शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे.

रामदास आठवले यांनी म्हटलं की, आगामी लोकसभा निवडणूक शिर्डी मतदारसंघातून मी लढणार आहे. महाराष्ट्रात २ जागांवर रिपाइं लोकसभा निवडणूक लढणार आहे, असं मला आश्वासन देण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Eknath shinde Ramdas Athawale
Ajit Pawar Latest Speech: १ रुपयात चहा मिळत नाही, पण सरकारने पीक विमा योजना आणली : अजित पवार

आगामी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंला मंत्रिपद देण्यात येईल, असंही आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत राहून लोकसभा निवडणूक लढणार अशी चर्चा झाली. उद्या होणाऱ्या NDA च्या बैठकीत अनेक मुद्दे मी पंतप्रधान मोदी यांच्या पुढे मांडणार आहे, असंही आठवले यांनी सांगितलं. (Political News)

रामदास आठवले यांनी अनेकदा शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्ते केली आहे. 2009 मध्ये त्यांनी शिर्डीतून निवडणूक लढवली होती. मात्र तेव्हा शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्याचा पराभव केला होता. मात्र आता पुन्हा रामदास आठवले यांनी शिर्डी मतदारसंघावर दावा केल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे. (Maharashtra News)

Eknath shinde Ramdas Athawale
BRS चा भाजपला दणका? सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ३५० कार्यकर्ते हैदराबादला मार्गस्थ

शिर्डी मतदारसंघातून सदाशिव लोखंडे विद्यमान खासदार आहे. शिंदे गटासोबत असलेल्या १२ खासदारांपैकी ते एक आहे. सदाशिव लोखंडे २०१४ आणि २०१९ असे सलग दोनदा येथे निवडून आले आहेत. मात्र रामदास आठवलेंच्या वक्तव्याने लोखंडे यांचं टेन्शन वाढलं असणार. तसेच आगामी लोकसभेत तिकीट वाटपावरून मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com