Ajit Pawar Latest Speech
Ajit Pawar Latest SpeechSaamtv

Ajit Pawar Latest Speech: १ रुपयात चहा मिळत नाही, पण सरकारने पीक विमा योजना आणली : अजित पवार

Ajit Pawar Latest Speech: 'सर्वात जास्त धरण पुणे जिल्हयात आहेत. काही जण टीका करतात की, एवढी धरण असून पाणी दिलं का? असेही अजित पवार म्हणाले.
Published on

Ajit Pawar News: '१ रुपयात आता काय मिळतं? चहा तरी मिळतो का? पण सरकारने १ रुपयात पीक विमा योजना आणली. या योजनेचा लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला. सर्वांनी याचा फायदा घ्या, असं वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. ते पुण्यातील जेजुरी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलत होते. (Latest Marathi News)

पुण्यातील जेजुरी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री चंद्रकांत पाटील,सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील,उपसभापती नीलम गोऱ्हे,आमदार,खासदार उपस्थितीत होते.

Ajit Pawar Latest Speech
Raj Thackeray Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत करणार चर्चा? संदीप देशपांडे म्हणाले...

या कार्यक्रमातील उपस्थितांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले, 'मी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा करिश्मा पाहिला आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांचं सरकार पाहिलं आहे. गेले ९ वर्ष नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश प्रगती पथावर चालला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्र विकासाची गाडी भरधाव वेगाने जाईल. महाराष्ट्र सरकारला मोठा निधी मिळत आहेत'.

'आपला कुटुंबासारखा कारभार चालला आहे. त्याचप्रमाणे राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहे. विकास होत असताना जमीन लागते, जमीन मर्यादित आहे. समृद्धी महामार्गाला अडचण होती, योग्य मोबदला दिला तर शेतकरी जमीन देतात,या सगळ्यात कुठे तरी मागे पुढे सरकावे लागते. कोणालाही हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वांना सोबत घेऊन विकास केला जाईलस, असे अजित पवार म्हणाले.

'आज २४ हजार लाभार्थ्यांनी भेटी दिल्या आहेत. अनेक लाभार्थी महिलांना लाखो रुपये मिळाले आहेत. अनेक योजना तुमच्या माझ्यासाठी आहेत. १ रुपयात काय मिळतं? चहा तरी मिळतो का,पण सरकारने १ रुपयात पीक विमा योजना आणली. लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे, सगळयांनी याचा फायदा घ्या, असेही पवार म्हणाले.

Ajit Pawar Latest Speech
Sanjay Raut On Jayant Patil: 'जयंतराव आणि आमचा डीएनए सारखाच', भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

'पावसाने ओढ दिली आहेत, त्यामुळे अनेक धरणात पाणी कमी आहे. सर्वात जास्त धरण पुणे जिल्ह्यात आहेत. काही जण टीका करत आहेत. एवढं पाणी धरणात आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यापासून अजून बारामतीला आलो नाही. मला उपसासिंचनाचे पैसे वाढले म्हणून फोन आले. उपसासिंचन योजनेचा अनेक ठिकाणी फायदा झाला, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com