Sanjay Raut On Jayant Patil: 'जयंतराव आणि आमचा डीएनए सारखाच', भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut Statement: 'आपला नेता आणि पक्ष अडचणीत असताना पळून जाणारा डरपोक आणि पळपुट्या नेतांपैकी जयंत पाटील नाहीत.', असं संजय राऊत यांनी सांगितलं.
Sanjay Raut On Jayant Patil
Sanjay Raut On Jayant PatilSaam Tv
Published On

Delhi News: राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची गुप्तभेट घेतल्याची चर्चा सुरु आहे. तसंच ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे. यावरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जयंतराव आणि आमचा डीएनए सारखाच, ते पळपुटे नाहीत', अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

Sanjay Raut On Jayant Patil
Rahul Gandhi News: मोठी बातमी! राहुल गांधींना खासदारकी बहाल, लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी

संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'जयंतराव पाटील हे शनिवारी इंडियासंदर्भात झालेल्या बैठकीला उपस्थित होते. इंडियाची ही बैठक ३१ आमि १ तारखेला यशस्वी व्हावी यासाठी त्यांनी कालही बैठकी घेतली. जयंत पाटील यांना मी ओळखतो. आपला नेता आणि पक्ष अडचणीत असताना पळून जाणारा डरपोक आणि पळपुट्या नेतांपैकी जयंत पाटील नाहीत.'

Sanjay Raut On Jayant Patil
Chandrasekhar Bawankule: देवेंद्रजींच्या मास्टरस्ट्रोकमुळे तुम्हाला घरी बसावं लागलं; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बावनकुळेंचं खरमरीत प्रत्युत्तर

तसंच, 'जयंत पाटील आणि आमचा डीएनए सारखाच आहे. आम्ही डरपोक आणि पळपुट्यांपैकी नाहीत. आम्ही लढणारे आहोत.', अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली. यावेळी संजय राऊत यांनी दिल्ली सेवा विधेयकावर प्रतिक्रिया देताना मोदी सरकारवर आरोप केले आहेत. त्यांनी असे सांगितले की, 'या देशातील संसद, विधिमंडळ हे उध्वस्त करण्याचं काम सुरू आहे.दिल्लीला पूर्ण राज्य देण्याची घोषणा निवडणूक प्रचारात भाजपने केली होती. भाजपचे केंद्रातील सरकार आज दिल्लीचा आहे तो दर्जा काढून संपूर्ण सरकार नोकरशाहीच्या हातामध्ये देणारे विधेयक आणत आहे.'

Sanjay Raut On Jayant Patil
Maharashtra Weather Update: मुंबईसह राज्यात आज कसा असेल पाऊस?, हवामान खात्याने दिली महत्वाची अपडेट

'दिल्लीत विधानसभा आहे, बहुमताचे सरकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की जमीन अधिग्रहण, पोलीस खाते, संरक्षण असे काही विषय सोडले तर इतर सर्व विषय दिल्लीच्या खात्यात असावे. तर लगेचच त्याविरोधात एक अध्यादेश येतोय. याचा अर्थ असा की, तुम्हाला निवडणून आलेले सरकार मान्य नाही, तुम्हाला लोकशाही मान्य नाही. राज्यपालांच्या माध्यमातून तुम्ही हे सरकार चालवू इच्छिता.', अशी टीका संजय राऊतांनी मोदी सरकारवर केली आहे.

Sanjay Raut On Jayant Patil
Gulabrao Patil News : गोंडगाव अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

संजय राऊतांनी पुढे सांगितले की,'या देशाच्या लोकशाही व्यवस्थेवरील सर्वात मोठा हल्ला या दिल्ली सेवा विधेयकाने होत आहे. त्यामुळे शिवसेनेसह आम्ही सर्वजण या विधेयकाला राज्यसभेत विरोध करणार आहोत.' अजितदादांचे अमित शहांनी तोंडभरुन कौतुक केले यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली आहे. 'त्यांचे हे कौतुक २०२४ नंतर सुद्धा कायम ठेवा. दादा योग्य जागी आहेत असे ते म्हणाले ते २०२४ नंतर सुद्धा बोला. या देशात जे राजकारण सुरु आहे त्यामुळे योग्य आणि अयोग्य काय याची व्याख्या ठरवता येत नाही. कालपर्यंत ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आज त्यांनाच सोबत घेतलं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com