rahul gandhi and narendra modi  saam tv
देश विदेश

Rahul Gandhi News: 'महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न...' राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi On Womens Reservation Bill: आरक्षणावरुन कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे.

Gangappa Pujari

Rahul Gandhi Press Conference:

मोदी सरकारनं बोलवलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक पारित करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं लोकसभेत महिला विधेयक मांडलं होतं, ते बहुमतानं पारित करण्यात आले. या आरक्षणावरुन कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी...

ओबीसींच्या मुद्द्यावरुन खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नरेंद्र मोदींवर हल्ला करताना भाजप ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ओबीसी समाजाबद्दल काय केले असे म्हणत फक्त ३ टक्केच ओबीसी सचिव का आहेत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच देशात पाच टक्क्याहून ओबीसी समाज आहे असे पकडू मात्र पाच टक्क्यांहून अधिक ओबीसी समाज असेल, तर तो किती आहे, हे कळलं पाहिजे. आणि मी एखादी गोष्ट ठरवली, तर केल्याशिवाय सोडत नाही, असा इशाराही राहुल गांधी यांनी यावेळी दिला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही सरकारवर निशाणा साधला. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के जागा दिल्या जाऊ शकतात. पण सरकारला तसं करायचं नाही. सरकारनं विधेयक मंजूर केलं आहे, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी 10 वर्षांनी होणार आहे. एवढंच नाहीतर, ते होणार की नाही हे देखील माहीत नाही (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

Hydrogen Railway: देशात लवकरच येणार हायड्रोजनवर चालणारी रेल्वे; वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT