राज्यातील काही भागात सध्या जोरदार पाऊस सुरू असला, तरी मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे. पाण्याअभावी मराठवाडा दुष्काळाच्या गर्तेत सापडला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालनासह अनेक भाग पावसाळ्यातही तहानलेला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात देखील टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. अहवालातून दोन्ही जिल्ह्यांमध्ये ८९ टँकर्सने पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विशेष म्हणजे सर्वाधिक २० टँकरने पैठण तालुक्यात पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाने दडी मारल्यामुळे मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे खरीपासह इतर पिकांना जीवदान मिळाले आहे. तर दुसरीकडे विहीरी कोरड्या असल्यामुळे ग्रामीण भागातील गावकऱ्यांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. (Latest Marathi News)
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील ३९ गावात आणि ५ वाड्यांमध्ये अजूनही टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच जालना जिल्ह्यातील २४ गावात आणि १७ वाड्यांमध्ये तीन शासकीय आणि ३६ खासगी टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. पैठण तालुक्यातील ५ वाड्या, जालना तालुक्यातील ३, बदनापूरातील ६, भोकरदन १ आणि मंठामधील १ वाड्यात टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ११, फुलंब्री तालुक्यातील १, पैठण २०, गंगापूर १, सिल्लोड तालुक्यातील ६ गावांमध्ये पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय जालना तालुक्यातील ५, बदनापूर ८, भोकरदन ३ ,जाफ्राबाद, घनसावंगी तालुक्यात प्रत्येकी ४ गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
जायकवाडी धरण - 30.66 टक्के पाणीसाठा
निम्न दुधना - 25.38 टक्के पाणीसाठा
येलदरी धरण - 61.48 टक्के पाणीसाठा
सिद्धेश्वर धरण - 58.91 टक्के पाणीसाठा
माजलगाव धरण - 11.19 टक्के पाणीसाठा
मांजरा धरण - 24.11 टक्के पाणीसाठा
पैनगंगा धरण - 72.32 टक्के पाणीसाठा
मानव धरण - 60.02 टक्के पाणीसाठा
निम्र पेरणा धरण पंचवीस- 25.09 टक्के पाणीसाठा
विष्णुपुरी धरण - 90.38 टक्के पाणीसाठा
सीना कोळगाव - 0.00 टक्के पाणीसाठा
एकूण पाणीसाठा - 44.47% टक्के
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.