Rahul Gandhi Latest News In Marathi SAAM TV
देश विदेश

Rahul Gandhi On Parliament Building Inauguration: नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, मोदींवर निशाणा साधत म्हणाले...

New Parliament Building: काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी संसद भवनाच्या उद्घाटनावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत सडकून टीका केली आहे.

Priya More

New Parliament Building Inauguration: दिल्लीतील नव्या संसद भवनाचे (New Parliament Building Inauguration) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आजपासून देशाला नवीन संसद भवन मिळाले. या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला काँग्रेसह अनेक पक्षांनी बहिष्कार टाकला. आता या संसद भवनाच्या उद्घाटनानंतर विरोधी पक्षनेत्यांकडून पीएम मोदींसह भाजपवर जोरदार टीका होऊ लागली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी संसद भवनाच्या उद्घाटनावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत सडकून टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीट करत फक्त दोन ओळींमध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 'संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत.', अशा शब्दात ट्वीट करत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. काँग्रेसने या कार्यक्रमला आधीच विरोध करत बहिष्कार टाकला होता. या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले नसल्याचा दावा करत अनेक विरोध पक्षांनी कार्यक्रमाला हजेरी न लावण्याचा निर्णय घेतला होता.

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना आमंत्रण देण्यात आले नसल्याचा दावा करत विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. देशभरातील 20 पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. विरोधी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संसद भवनाचे उद्घाटन झाल्यानंतर टीका करण्यास सुरुवात केली आहे. 'राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ऐतिहासिक कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले. हे भाजप आणि आरएसएसची दलीत, आदिवासी आणि मागास समाजाविरोधातील वृत्ती दाखवते.', अशी टीका विरोधकांनी केली आहे.

पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत काँग्रेसने म्हटले की, 'संसदीय परंपरांचा तिरस्कार करणाऱ्या अशा आत्ममग्न हुकूमशहा पंतप्रधानांच्या हस्ते संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे.' काँग्रेसचे वरिष्ठ नेते के सी वेणुगोपाल यांनी ट्वीट करत सांगितले की, 'संसदेच्या नवीन भवनाच्या शिलान्यास कार्यक्रमाला तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दूर ठेवले गेले. या उद्घाटन समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देखील बोलावण्यात आले नाही. हा आरएसएसचा मागास समाजाविरोधी आणि उच्च जातीवाला विचार आहे. त्यामुळेच त्यांनी रामनाथ कोविंद आणि द्रौपती मुर्मू यांना सन्मान दिला नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT