Rahul Gandhi Criticized PM Modi Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi : PM मोदी घाबरलेत, भर सभेत स्टेजवर रडू शकतात - राहुल गांधी

Rahul Gandhi Criticized PM Modi: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील विजापूर येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

Rohini Gudaghe

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील विजापूर येथे कॉंग्रेस नेते (Congress) राहुल गांधी यांची जाहीर सभा पडली. या सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, आजकाल पंतप्रधान मोदी खूप घाबरलेले दिसत आहेत. कदाचित येत्या काही दिवसांत ते सभेत स्टेजवर रडू शकतात, असा खोचक टोला राहुल गांधींनी मोदींना (PM Modi) लगावला.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशभरात मतदान होत आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील सभेत जनतेला संबोधित करताना म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी २४ तास तुमचं लक्ष (Lok Sabha Election) दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतात. एक दिवस ते पाकिस्तान तर दुसऱ्या वेळेस ते चीनबद्दल बोलतील. एखाद्या दिवशी ते तुम्हाला थाळी वाजवायला सांगतील, तर कधी तुमच्या मोबाईलचा फ्लॅश लाईट चालू करायला सांगतील.

यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षांत गरिबांचे पैसे हिसकावले आहेत. देशातील ७० कोटी जनतेकडे जेवढा पैसा आहे, तेवढाच पैसा त्यांनी देशातील २२ लोकांना दिला. भारतात ४० टक्के संपत्ती नियंत्रण ठेवणारे एक टक्का लोक आहेत. त्यामुळे बेरोजगारी, महागाई हटवून काँग्रेस पक्ष तुम्हाला सहभागी करून घेईल. नरेंद्र मोदींनी अब्जाधीशांना जेवढा पैसा दिलाय, तेवढाच पैसा आम्ही भारतातील गरिबांना देऊ, असं त्यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदींनी मागील १० वर्षात २० ते २५ लोकांना अब्जाधीश बनवलं आहे. त्यांनी विमानतळ-बंदर, वीज, खाणी, सौर-पवन ऊर्जा, संरक्षण क्षेत्र अदानींसारख्या अब्जाधीशांच्या हाती दिले (Lok Sabha 2024) आहे. मात्र, गरिबांना काहीच दिले नाही. कर्नाटकात काँग्रेस पक्षाने दिलेली हमी पूर्ण केलेली आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील अणेकल येथील मतदान केंद्राबाहेर आज गोंधळ झाला. तेथे काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं दिसले. मात्र, घटनेनंतर काही वेळातच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला (Rahul Gandhi Criticized PM Modi) होता. येथील बूथबाहेर काही कार्यकर्ते मत मागण्यासाठी आले होते, असं सांगण्यात येत आहे. यानंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तनाव निर्माण झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT