Rahul Gandhi presents documents alleging voter fraud by Election Commission during a press conference saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi: कुठे मतदार वाढले, कुठे नावात चुकी; राहुल गांधींनी दाखवले एका मागोमाग मत चोरीचे पुरावे

Rahul Gandhi PC On Vote Chori: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सतत निवडणूक आयोगावर मतदानाच्या हेराफेरीचे आरोप करतात. आज त्यांनी आरोपांशी संबंधित पुरावेच सर्वांसमोर दाखवले. पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी महाराष्ट्रापासून कर्नाटकात मतांची चोरी कशी झाली याचे पुरावे दिलेत.

Bharat Jadhav

  • राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मत चोरीचे गंभीर आरोप केले.

  • त्यांनी महाराष्ट्र व कर्नाटकातील मतदार यादीतील गडबडीचे पुरावे सादर केले.

  • या साऱ्या गोंधळाचा फायदा भाजपला मिळाला, असा आरोप त्यांनी केला.

  • मत प्रक्रिया महिनाभर चालल्यामुळे लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उभं राहिल्याचं राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मत चोरीचे पुरावे दाखवले. त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत घेत सर्वांसमोर एका मागोमाग पुरावे दाखवले. मतदारांच्या यादीत कशाप्रकारे गडबड केली गेली याचे पुरावे राहुल गांधींनी दिलेत. कर्नाटक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा हवाला देताना त्यांनी मतदारांच्या यादीत मोठ्या प्रमाणात गडबड करण्यात आली. जेणेकरून भाजपला निवडणुकीत फायदा होईल. महिनाभर चालणाऱ्या निवडणूक प्रक्रियेवरून संशय निर्माण होत असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीच्या निकालांवरही प्रश्न उपस्थित केलेत. लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीत आणि मतदानातील गडबडीवर बोलताना ते म्हणाले, एक्झिट पोल वेगळंच असतात. तर निवडणुकीचे निकाल वेगळेच लागतात.महाराष्ट्राच्या निवडणुकीवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्रात ४० लाख मतदार आहेत, ज्याचं रहस्य अजून समजलेले नाही.

महाराष्ट्रात मतदार वाढलेत

एक काळ असा होता, जेव्हा इलेक्ट्रॉनिक मशीन्स नव्हत्या, तेव्हा संपूर्ण देश एकाच दिवशी मतदान करत होते. पण आजच्या काळात, उत्तर प्रदेशात मतदान वेगवेगळ्या वेळी होते. बिहारमध्ये ते वेगवेगळ्या वेळी होत आहे. मतदान प्रक्रिया महिनाभर चालते. यावर आम्ही चिंता व्यक्त करत आहोत. महाराष्ट्रात ५ वर्षांपेक्षा ५ महिन्यांत जास्त मतदार जोडले गेलेत. महाराष्ट्राच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार जोडले गेलेत. यामुळे अधिक संशय निर्माण होतो, असं राहुल गांधी म्हणाले.

निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करताना राहुल गांधी म्हणाले, निवडणूक आयोगाने आम्हाला मतदार यादी देण्यास नकार दिला. निवडणूक आयोग मतदार यादींना मशीन रीडेबल डेटा देत नाही जेणेकरून हे सर्व पकडले जाऊ नये. महाराष्ट्रातील निवडणुकीत संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर मतदानात मोठी वाढ झाली, असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येत परंतु असं काही झालं नाहीये.

एक लाख पेक्षा जास्त मतांची चोरी

मत चोरीवर बोलताना राहुल गांधी यांनी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकींचे पुरावे दाखवले. बेंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले. त्यांनी असा दावा केला की , बेंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी ६ मतदारसंघात भाजप पिछाडीवर आहे, परंतु महादेवपुरा येथे त्यांना एकतर्फी मत मिळाले. तेथे एक लाखापेक्षा जास्त मतांची चोरी झाली. एकाच पत्त्यावर ५०-५० मतदार होते, अनेक ठिकाणी नावे सारखीच होती, पण फोटो वेगवेगळे होते. जवळपास ११,९६५ डुप्लिकेट मतदार होते. तर ४० हजार मतदारांचा पत्ता बनावट होता.

एकाच पत्त्यावर १० हजार पेक्षा जास्त मतदारांचे नाव होते. तर ४ हजार पेक्षा जास्त मतदारांचे फोटो अवैध होते. ३३ हजार पेक्षा जास्तवेळा फॉर्म ६ चा गैरवापर करण्यात आला. याचदरम्यान राहुल गांधींनी बनावट पत्त्याचा पुरावा दाखवला. ज्यामध्ये मतदारांसमोर असलेल्या पत्त्यात घराचा पत्ता 0 असे लिहिले होते. असा पत्ता असणारे हजारो लोक होते. अनेकांच्या वडिलांचे नाव hhgassjk असल्याचे आढळून आले. तर घर क्रमांक ३५ मधील ८० मतदारांनी त्याच घरातून मतदान केले. घर क्रमांक ७९१ मधील ४६ मतदारांनी मतदान केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: रक्षाबंधनाला सोन्याचे दर घसरले, तरीही विक्री कमीच; वाचा आजचे भाव

पुस्तक घेऊन परीक्षेला बसा, CBSE चा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर

Sonalee Kulkarni : लाल परी! सोनालीच्या बोल्ड लूकनं केलाय कहर, पाहा PHOTOS

सासरच्या छळाला कंटाळली, विवाहितेनं घरातच आयुष्य संपवलं; माहेरच्या मंडळींना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT