Priyanka Gandhi  saam tv
देश विदेश

Priyanka Gandhi Networth: दिल्ली-शिमल्यामध्ये आलिशान घर, डोक्यावर १५ लाखांचे कर्ज; प्रियंका गांधींचे एकूण नेटवर्थ किती?

Wayanad Loksabha By-Elections: प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी केरळमधील वायनाडमधून लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या उत्पन्नाचा खुलासा केला आहे.

Priya More

Priyanka Gandhi: केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी केरळमधील वायनाडमधून लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे हे त्यांच्यासोबत उपस्थित होते. प्रियंका गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या उत्पन्नाचा खुलासा केला आहे.

प्रियंका गांधी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची आणि त्यांचे उद्योगपती पती रॉबर्ट वाड्रा यांची एकूण संपत्ती ८८ कोटी रुपये इतकी आहे. प्रियंका गांधी यांनी वायनाडच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर तीन अर्ज दाखल केले. यावेळी प्रियांका गांधी आणि त्यांचे पती यांच्या संपत्तीची माहिती त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली. प्रियांका गांधी यांची एकूण संपत्ती जवळपास १२ कोटी रुपये इतकी आहे. हिमाचल प्रदेशातील शिमलाजवळ त्यांचे ५.६४ कोटी रुपयांचे फार्महाऊस आहे. हे फार्महाऊस १२,००० स्क्वेअर फूटांचे आहे.

प्रियांका यांच्याकडे ८ लाख रुपयांची होंडा CRV कार आहे. ही कार त्यांना पती रॉबर्ट वाड्रा यांनी गिफ्ट म्हणून दिली आहे. इतर मालमत्तेमध्ये १.१६ कोटी रुपयांच्या दागिन्यांसह २.२४ कोटी रुपयांच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा समावेश आहे. प्रियंका गांधी यांच्याकडे राहुल गांधी यांच्यासोबत दिल्लीमध्ये २.१० कोटी रुपयांची शेतजमीन आहे. ही जमीन त्यांना वारसाहक्काने मिळाली आहे. तिथे असलेल्या फार्महाऊसच्या इमारतीचा अर्धा भागही त्याच्या मालकीचा आहे.

प्रियंका गांधी यांनी मागच्या आर्थिक वर्षात ४६.३९ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न घोषित केले आहे आणि यामध्ये बँक आणि इतर गुंतवणुकीतील व्याज व्यतिरिक्त भाड्याच्या उत्पन्नाचा समावेश आहे. त्यांच्या पतीची जंगम मालमत्ता ३७.९ कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि २७.६४ कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर मालमत्ता आहे. काही कंपन्यांच्या सहभागाव्यतिरिक्त यामध्ये काही वाहनांचाही समावेश आहे.

प्रियंका गांधी यांच्याकडे १.१५ कोटी रुपयांचे ४,४०० ग्रॅम सोने आहे. प्रियंका गांधी यांच्यावर १५.७५ लाखांचे कर्ज आहे. तर रॉबर्ट वाड्रा यांच्यावर १० कोटींपेक्षा जास्त रुपयांचे कर्ज आहे. प्रियंका गांधी यांना १५ लाख रुपयांपेक्षा जास्त कर भरावा लागतो. प्रियंका गांधी यांनी म्युच्युअल फंडातही गुंतवणूक केली आहे. त्यांनी म्युच्युअल फंडात एकूण २ कोटी २४ लाख ९२ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांचे ३ बँक अकाऊंट असून त्यात ३ लाख ६१ हजार रुपयांपेक्षा जास्त ठेवी आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत त्यांच्याकडे ५२ हजार रुपये रोख रक्कम होती. प्रियांका गांधी वाड्रा यांच्या पीपीएफ खात्यात १७ लाख ३८ हजार २६५ रुपये होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Vacation Place : मुंबईतील 'या' ठिकाणी प्लान करा दिवाळी सुट्टीचा बेत, मुलं होतील एकदम खूश

IND Vs NZ 2nd Test: चेंडू समजण्याआधीच उडाला 'हिटमॅन'चा त्रिफळा; रोहित शर्मा चौथ्यांदा बनला साउदीचा शिकार

Paneer Eating Benefits: धावपळीच्या जगात तंदुरुस्त राहण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Ajit Pawar vs Yugendra Pawar : शरद पवार यांचा 'नवा गडी, नवा डाव'; बारामतीत अजित पवारांविरोधात उमेदवार कसा ठरला?

Maharashtra Assembly Election : बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार; कुणाला मिळाली उमेदवारी? शरद पवार गटाची पहिली यादी वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT