Police investigate the scene after a Congress leader was brutally attacked with an axe in Ludhiana. Saam Tv
देश विदेश

रक्तरंजित थरार! काँग्रेसच्या बड्या नेत्यावर धारदार शस्त्राने वार; डोक्याचे केले २ तुकडे

Congress Leader Murdered In Ludhiana Axe Attack: लुधियानामध्ये काँग्रेसचे स्थानिक नेते परमिंदर तिवारी यांची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या करण्यात आली. दोन अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यावर वार करून त्यांचा खून केला.

Omkar Sonawane

लुधियाना जिल्ह्यातील मच्छीवारा शहरातील तखरन गावात काँग्रेसचे स्थानिक नेते परमिंदर तिवारी यांची हत्या केली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता ते बसस्थानकाजवळील त्यांच्या निवासस्थानी खुर्चीवर बसले असताना दोन हल्लेखोर त्यांच्याजवळ आले. त्यांनी मागून कुऱ्हाडीने त्याच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यामुळे ते जमीनवर कोसळले. त्यांच्या डोक्याची कवटी फुटली होती आणि जिकडे तिकडे रक्त आणि डोक्याचे तुकडे पडलेले होते. त्यानंतर आरोपी कुऱ्हाड तिथेच सोडून पळून गेले.

दरम्यान, त्यांचा मुलगा तिथे पोहोचला आणि त्याने परमिंदर तिवारी यांना रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेले पाहिले. त्यांना तात्काळ माछीवारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवले. त्यानंतर तिवारी कुटुंबीयांनी त्यांना फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच, कुमकलान पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात दोन अज्ञात व्यक्तींचा सहभाग होता. परमिंदर तिवारी यांच्या मुलाने सांगितले की, जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा त्याचे वडील जमिनीवर पडलेले होते . कोणीतरी त्यांच्या डोक्यावर वार केला होता. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, तिवारी नेहमीप्रमाणे घटनास्थळी आले असता दोन जणांनी त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला केला. हल्लेखोरांना यापूर्वी त्या परिसरात कधीही पाहिले गेले नसल्याने आम्ही त्यांना ओळखले नाही.

१०० नंबरवर फोन केला, पण कोणीच उत्तर दिले नाही

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आम्ही हल्लेखोरांना नावाने ओळखत नव्हतो, पण ते दिसल्यास त्यांना ओळखू. त्याच्या म्हणण्यानुसार, ते दोन हल्लेखोर त्या परिसरात यापूर्वी कधीही दिसले नव्हते. आम्ही त्या हल्लेखोरांना तिवारींच्या डोक्यावर हल्ला करताना पाहिले. आम्ही त्यांना पकडण्याचा प्रयत्नही केला, पण हल्लेखोरांकडे कुऱ्हाडी होत्या आणि आमच्याकडे कुठलेही शस्त्र नसल्याने आम्ही हादरलो होतो. पण आम्ही तात्काळ १०० वर फोन केला, पण कोणीही फोन उचलला नाही. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : शेवटच्या क्षणी बाजी पलटली; 'बिग बॉस मराठी 6'चा स्ट्राँग स्पर्धक घराबाहेर, नाव वाचून बसेल धक्का

Monday Horoscope : गोड गुलाबी संसारात मिठाचा खडा पडणार; ५ राशींच्या लोकांना घ्यावे लागणार काळजीपूर्वक निर्णय

Bigg Boss Marathi 6 Finale: 'घरी वहिनींचा धक्का...'; ‘बिग बॉस मराठी ६’ ग्रँड फिनालेमध्ये जिनिलिया आणि अभिषेक बच्चनची खास एन्ट्री

महिला बचत गटाच्या नावावर ५ लाखांची फसवणूक; बनावट सह्या अन् ...; |VIDEO

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

SCROLL FOR NEXT