Anil Antony Joins BJP Saamtv
देश विदेश

Anil Antony Joins BJP: काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा मुलगा भाजपमध्ये; PM मोदींचा उल्लेख करत जबाबदारी आणि कर्तव्येही सांगितली

AK Antony Son Joins BJP: महिन्यापूर्वीच त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती, त्यानंतर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Gangappa Pujari

Anil Antony Joins BJP: उद्योजक गौतम अदानींच्या मुद्यावरुन राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भाजपविरोधात रान पेटवले आहे. एकीकडे भाजपविरोधात विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असतानाच कॉंग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी गुरुवारी (६ एप्रिल) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, केरळ काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचे माजी संयोजक अनिल अँटोनी यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, व्ही मुरलीधरन, केरळ भाजप अध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) प्रवेश केला आहे.

2002 च्या गुजरात दंगली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या वादानंतर अनिल अँटनी यांनी जानेवारीमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. अनिल अँटोनी यांचे वडील ए.के.अँटनी काँग्रेस सरकारमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री होते. याशिवाय ते केरळचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. ए के अँटोनी यांचे नाव कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांमध्ये घेतले जाते.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर "एक भारतीय तरुण या नात्याने पंतप्रधानांच्या राष्ट्र उभारणी आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीकोनात योगदान देणे ही माझी जबाबदारी आणि कर्तव्य आहे असे मला वाटते," अनिल अँटनी यांनी दिली आहे. कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्यापूर्वी ते कॉंग्रेस केरळचे सोशल मीडिया समन्वयक म्हणून काम पाहत होते.

पीयूष गोयल यांनी केले स्वागत..

या पक्षप्रवेशानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी त्यांचे स्वागत केले. "अनिल अँटनी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. अनिल अँटोनी यांची प्रतिभा पाहिल्यावर मी खूप प्रभावित झालो. त्यांची विचारसरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मिळती जुळती आहे. आम्हांला खात्री आहे की ते अतिशय सक्रिय भूमिका बजावत राहतील आणि दक्षिण भारतात भाजपचा ठसा वाढवण्यात मदत करतील," असे ते यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अचलपुरात बच्चू कडूंना मोठा धक्का; भाजपचे प्रवीण तायडे विजयी

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

SCROLL FOR NEXT