PM Modi Vs Congress : ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी PM मोदींची गरजच काय? काँग्रेसचा हल्लाबोल

Congress Mallikarjun Kharge On PM Narendra Modi : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर हल्ला चढवला.
PM Modi Vs Congress : ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी PM मोदींची गरजच काय? काँग्रेसचा हल्लाबोल
Published On

Congress Mallikarjun Kharge On PM Narendra Modi : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारवर हल्ला चढवला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं.

मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर सडकून टीका केली. जुन्या ट्रेनला नवे इंजिन लावून मोठमोठी भाषणे करण्यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही. ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गरज काय? त्यासाठी तेथील स्थानिक खासदार आहेत, असे खरगे म्हणाले. (Latest Marathi News)

PM Modi Vs Congress : ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी PM मोदींची गरजच काय? काँग्रेसचा हल्लाबोल
Roshni Shinde beating case: रोशनी शिंदे मारहाण प्रकरण! राज्य महिला आयोगाने घेतली दखल; ठाणे पोलीस आयुक्तांना दिले महत्वाचे आदेश

यावेळी खरगे यांनी पत्रकार परिषदेत अनेक आरोप केले. मोदी सरकार नेहमी लोकशाहीबद्दल भरभरून बोलतं. पण ते लोकशाहीला काही महत्व देत नाहीत. त्यांच्या कृतीतून तसे कधी दिसून येत नाही, असेही खरगे म्हणाले.

'अदानींची संपत्ती अडीच वर्षांत कशा प्रकारे १२ लाख कोटींपर्यंत गेली हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. ५० लाख कोटींचा अर्थसंकल्प अवघ्या १२ मिनिटांत कसा मंजूर करण्यात आला? आम्ही हा प्रश्न केला, पण ज्या-ज्या वेळी आम्ही यावर बोलण्यासाठी उभे राहायचो, त्यावेळी नोटीस बजावत होते.

त्यासंदर्भात मागणी केली तर, आम्हाला बोलण्याची परवानगी दिली जात नव्हती,' असा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. मला राजकारणात ५०-५२ वर्षे झाली, पण आम्ही कधीही याआधी अशी परिस्थिती बघितली नाही, असेही ते म्हणाले.

PM Modi Vs Congress : ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी PM मोदींची गरजच काय? काँग्रेसचा हल्लाबोल
Parliament Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही गदारोळ, राज्यसभा आणि लोकसभा पुढील अधिवेशनापर्यंत तहकूब

सरकार केवळ एकच व्यक्तीला सर्व गोष्टी का देत आहे? तुम्ही त्यांना विमानतळे दिली. रस्ते दिले, बंदरे दिली, रेल्वे दिली. यावरून दिसते की हे सरकार केवळ एकाच व्यक्तीला श्रीमंत का करत आहे? असे प्रश्नही मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केले.

काँग्रेसचा तिरंगा मोर्चा

काँग्रेसने आज अन्य विरोधी पक्षांच्या सोबत विजय चौकापर्यंत तिरंगा मोर्चा काढला. तत्पूर्वी काँग्रेसने ट्विट करून अदानी मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अदानी महाघोटाळ्यावर मोदी सरकार जेपीसी गठीत करू इच्छित नाही. पण या मागणीसाठी आम्ही संसदेपासून विजय चौकापर्यंत तिरंगा मोर्चा काढला आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com