Congress Saam TV
देश विदेश

Hath Se Hath Jodo : भारत जोडो यात्रेनंतर काय? काँग्रेसचा मोठा प्लान आला समोर

येत्या नवीन वर्षात 26 जानेवारीपासून देशात हात से हात जोडो अभियान काँग्रेस सुरु करणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचं काम या यात्रेनं केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचं काम या यात्रेनं केलं आहे. ही यात्रा येत्या 26 जानेवारीपर्यंत श्रीनगरमध्ये दाखल होईल.

मात्र त्यानंतर काँग्रेसची पुढची रणनिती काय असेल? काँग्रेसने सुरु केलेला जनतेसोबतचा कनेक्ट कायम ठेवण्यासाठी भारत जोडो यात्रेनंतर कॉंग्रेसचा मोठा प्लान समोर आला आहे. (Latest Marathi News)

येत्या नवीन वर्षात 26 जानेवारीपासून देशात हात से हात जोडो अभियान काँग्रेस सुरु करणार आहे. ब्लॉक, पंचायत, बुथ स्तरावर हे अभियान राबवलं जाणार आहे. कॉंग्रेस नेते के सी वेणूगोपाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दोन महिने चालणार हे अभियान चालणार आहे.

या अभियानामार्फत राहुल गांधी यांचे पत्र लोकांच्या हाती दिले जाणार आहे. या पत्रात अभियानाचा संदेश असेल आणि त्यासोबत मोदी सरकारच्या विरोधात एक आरोपपत्रही जोडले जाईल.

'भारत जोडो' यात्रा 24 डिसेंबरला दिल्लीत पोहोचेल आणि 26 जानेवारीला श्रीनगरमध्ये दाखल होणार आहे. यानंतर 'हाथ से हाथ जोडो अभियान' अंतर्गत तीन स्तरीय कार्यक्रम होणार आहे. ब्लॉक आणि बूथ स्तरावर यात्रा काढण्यात येणार आहेत.

या अभियानानंतर जिल्हा स्तरावर अधिवेशने आणि राज्य स्तरावर रॅली काढण्यात येणार आहेत. यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते 'हाथ से हाथ जोडो अभियान'शी संबंधित कार्यक्रमांना उपस्थित राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: मेहेकर तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Apple Milkshake Recipe : व्यायाम करून आल्यावर प्या 'ॲपल मिल्कशेक', दिवसभर रहाल उत्साही

Achyut Potdar Death : सिनेसृष्टीवर शोककळा, 3 Idiots मधील प्रोफेसर काळाच्या पडद्याआड

Hingoli Heavy Rain Flood : पावसाचा जोर वाढला, हिंगोलीत महापुरामुळे दोघांचा मृत्यू, मृतांच्या गावावर शोककळा

Mumbai : शाळेतून परत येताना बेस्टने उडवले, माय-लेकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT