Solapur Wedding: दोन बायका फजिती ऐका; जुळ्या बहिणींचा एकाच तरुणाशी विवाह, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दिला 'आहेर'

जुळ्या बहिणींचा जीव एकाच मुलावर जडल्याने दोघींची त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
Solapur Wedding
Solapur WeddingSaam TV
Published On

Solapur NEWS : सोलापुरात एक अजब विवाह सोहळा शुक्रवार 2 डिसेंबर रोजी पार पडला. या विवाह सोहळ्याची चर्चा राज्यभर सुरु आहे. कारण एक वर आणि दोन वधू असा हा लग्नसोहळा होता.

जुळ्या बहिणींचा जीव एकाच मुलावर जडल्याने दोघींनी त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलाचीही समंती मिळाल्याने थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. मात्र पोलिसांची एंन्ट्री झाली तिघांच्या आनंदावर विरजण पडलं. (Latest Marathi News)

मुंबईच्या जुळ्या बहिणींचा विवाह एकाच तरुणाशी पार पडला. दोघी बहिणी आयटी इंजिनिअर आहेत. या विवाह सोहळ्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी नवरदेव मुलावर गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर याप्रकरणी कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (Solapur)

माळशिरस येथे पार पडलेल्या लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर झपाड्याने व्हायरल झाले होते. यानंतर या प्रकरणी पोलिसांनी नवरदेवावर भारतीय दंड संहितेच्या कलम 494 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Solapur Wedding
Video : छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख; रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तरुणाने 36 वर्षीय जुळ्या बहिणींशी लग्न केले. वधू आणि वराच्या कुटुंबीयांनी अशा लग्नाला होकार दिला होता. मात्र लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे लग्न वैध आहे की नाही? असा सवाल युजर्स विचारत होते.

वडिलांचे निधन झाल्यानंतर जुळ्या बहिणी आईसोबत राहत होत्या. तर नवरदेव अतुल हा माळशिरस येथील असून तो मुंबईत ट्रॅव्हल एजन्सी चालवतो. काही दिवसांपासून मुली माळशिरस तालुक्यात आईसोबत राहत होत्या. दरम्यान अतुलने दोन्ही बहिणींना बरीच मदत केली होती, तेव्हापासून त्यांची जवळीत वाढली होती.

Solapur Wedding
Shraddha Walker case : २३ दिवस चौकशी करूनही पोलिसांचे हात रिकामे; अफताब विरोधात अद्याप ठोस पुरावा नाही

मुलींची आई आजारी पडली, त्यावेळी अतुलने बरंच सहकार्य केलं होतं. दरम्यान अतुल दोन्ही जुळ्या बहिणींच्या जवळ आला. दोघांनी अतुलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी दोन्ही बहिणींचे अतुलसोबत लग्न झाले, त्यानंतर या लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी वरावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com